स्वतः बेजबाबदार आणि दोष शासनाला; गिरगाव येथिल धक्कादायक प्रकार
वसमत:- मुबंई, पुणे, औरंगाबाद, नांदेड, येथे महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक कोरोना संख्या वाढत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील हे प्रमाण कमी असुन देखिल वसमत तालुक्यातील गिरगाव येथे कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे, त्यात उपचार करून काही रुग्ण घरी आले आहेत, चार ते पाच रुग्णांचा मृत्यू देखिल झाला आहे.
गिरगाव हे गाव तिन तालुक्याच्या टोकाचे गाव १५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोरोना संक्रमण वाढत आहे. गिरगाव प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असले तरी. हा वाढता प्रादुर्भाव कमी होत नाही. गिरगाव येथिल काही नागरिकांनी याला मुख्य कारण अवास्तव गर्दी जमवून होणारे लग्न व कोणाच्या मौतीस होणारी गर्दी हे असल्याचे सांगितले आहे.
१५० च्या वर रुग्णांना उपचार मिळाले असुन त्यात सुखरूप ६० लोक घरी परत आले आहेत. परंतु आता ग्राम पंचायत प्रशासनाने व आरोग्य विभागाने,गट विकास अधिकारी, पोलिस प्रशासनाने या सर्व गोष्टी कडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे काही स्थानिक जबाबदार नागरिकांचे म्हणणे आहे.
राज्य शासनाने लग्नाच्या वेळी केवळ ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु ग्रामीण भागात आजही लग्न मोठ्या प्रमाणात गर्दी एकत्रित करून केले जात आहेत. पोलीस पाटील, ग्रामसेवक, आदी प्रशासकीय सेवेत असणाऱ्यांनी याची वेळीच माहिती वरिष्ठ पातळीवर देऊन यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने निर्जंतुकीकरण फवारण्या व मास्क वाटप केले आहे, परंतु लोकांना अँटिझीन तपासणी करण्यात प्रेरित करावे लागणार आहे.
त्यात ज्यांना अस्थमा, शुगर,कॅन्सर, बिपी, इत्यादी रोगांची लागण असेल अशांना वसमत येथे उपचारासाठी दाखल करण्यात यावे, आणि जे तरुण पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना विलगिकरन करण्यात यावे, किंवा गृहविलगिकरन करावे. साधारणपणे २० दिवस एकमेकांना एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी काही प्रमाणात उपाययोजना करण्यात याव्या असे गिरगावात सध्या बोलले जात आहे.
Post a Comment
We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe