Suicide: लग्न न होण्याच्या शक्यतेने प्रेमी युगलाची आत्महत्या

कळमनुरी:- तालुक्यातील गुंडलवाडी शिवारात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून प्रेमी युगलाने जीवन यात्रा संपविण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेतील मुलाचे वय केवळ 16 वर्षे असून मुलीचे वय 18 वर्षे आहे. अजय केशव डुकरे (१६) आणि सरस्वती कऱ्हाळे (१८) अशी या प्रेमीयुगुलांची नावे आहेत.
कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथील या प्रेमीयुगुलाने गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतशिवारात एकाच दोरीने गळफास लावून जीवन यात्रा संपविली. या घटनेमूळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस करीत आहेत. आपले लग्न होणार नाही, या शक्यतेने त्यानी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असले तरी त्याना आत्महत्येस प्रावृत्त केले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याने, पोलिस त्या दृष्टीनेही तपास करीत आहेत.

हे ही वाचा: स्वस्तात मस्त ब्रॅन्डेड सॅमसंग मोबाईल......

A shocking incident was revealed in Gundalwadi village shivara in Kalamburi tehsil, where a loving couple ended their life journey by hanging themselves from a mango tree with a rope. The boy in this case is only 16 years old and the girl is 18 years old. The names of the love birds are, Ajay Keshav Dukare (16) and Saraswati Karhale (18). The incident has caused a stir in the area. Akhada Balapur police are investigating the matter further.


Post a Comment

0 Comments