साखरा प्रकरणात मित्रानेच केला मित्राच्या आजीचा केला खून

पोलिसी खाक्यात आरोपीने दिली आणखी एका खुनाची कबुली....

आरोपीसह पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी
हिंगोली:- सेनगाव तालुक्यातील साखरा येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात जिवलग मित्राच्या आजीचा खून मित्रानेच केला असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणातील आरोपीने साखरा येथीलच एका अन्य महिलेचा ऑगस्ट महिन्यात खून केला असल्याची कबुली दिली आहे.

याबाबत हिंगोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.०९/०४/२०२१ चे ०९.०० ते दि.१०/०४/२०२१ चे १०.०० वा.चे दरम्याण साखरा शेत शिवारातील गायरान शिवारात एका वयोवृद्ध महिलेचे अर्धवट पुरलेल्या अवस्थेत प्रेत मिळून आल्याने हिंगोली जिल्हयात खळबळ उडाली होती. सर्वत्र भितीचे वातावरण होते. तसेच यापूर्वी सुध्या ऑगष्ट २०२० मध्ये साखरा येथील एका वयोवृध्द महिलेचा स्वतःचे घरामध्ये रात्रीच्या सुमारास खून करून तिचे अंगावरील दाखदागीणे लुटून नेले होते. सदर घटनेचा अद्याप छडा लागला नव्हता. एका पाठोपाठ एक असे सलग दोन खून झाल्याने हिंगोली जिल्ह्यात सळवळ उडाली होती व एकटे रहाणाऱ्या वयोवृद्ध महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अनेक दिवस तपास करून सुद्धा सदरचा खून उघड झालेला नव्हता. या प्रकरणातील आरोपी हा मयाताचा नातू आणि सेनगाव तालुक्यातील तरुण सामाजिक नेते अशोक इंगळे यांचा जवळचा मित्र होता. त्यानेच हा खून केला आहे.
हाच तो आरोपी
या प्रकरणात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सदरचे सिरीयल खून उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना योग्य त्या सूचना देवनू पोउपनि शिवसांब घेवारे यांच्या अधिपत्याखाली पोहे भगवान आडे, राजू ठाकुर, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेवश्वर पायघण यांचेसह एक विशेष पथक तयार करून सदर गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.

पोनि उदय खंडेराय व पोउनि शिवसांब घेवारे हे पथकासह घटनास्थळी भेट देउन मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मयताची ओळख पटवून मयत नामे भारजाबाई भ्र.मारोती इंगळे वय ८२ यर्षे रा. साखरा ही असल्याचे निष्पन्न करून फिर्यादी नामे सुरेश पि. मारोती इंगळे रा.साखरा ता सेनगांव यानी त्यांची आई भारजाबाई भ्र.मारोती इंगळे हित कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे अंगावरील सोन्याचांदीचे दागीणे काढून तिचे कपाळावर व चेहऱ्यावर मारून निर्घृण खून केला व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयत हिचे प्रेत खडयात पुरून टाकल्याचे दिसून आले. फिर्यादीचे फिर्यादवरून पो.स्टे. सेनगांव येथे गुर नं. १११/२०२१ कलम ३०२, ३९४, २०१ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी महत्वाचे धागादोरा जमा करून गुप्त बातमीदार नेमूण माहिती घेतली असता सदर गुन्हयातील आरोपी हा दिलीप अंबादास लाटे वय ३२ वर्षे व्यवसाय मजुरी रा.साखरा ता. सेनगांव जिल्हा हिंगोली असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेउन विश्वासात घेउन सदर गुन्हयातील वयोवृद्ध महिलेच्या खूना बद्दल विचारपूस केली असता त्याने सदरचा खून वृध्द माहिलेच्या अंगावरील सोने लुटून पैशासाठी खून केला असल्याची कबुली दिली. तसेच सदरचा खून करण्यापूर्वी सदर वृद्ध महिलेस झोपेच्या गोळ्या खाऊ घालून तिला बेशुध्द करून तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत माळरानावरील खडयात पुरल्याचे कबुल केले.

त्यावेळी त्यास अधिक विश्वासात घेउन यापूर्वी ऑगष्ट महिन्यात साखरा येथील वृध्द महिलेचा खूनाबद्दल विचारपूस केली असता साखरा गावातील मनकर्णाबाई तुळशीराम सरूळे हिचे घरात घूसून रात्रीच्या वेळी सरकारी योजनेची माहिती सांगण्याचा बहाणा करून तिचे डोक्यात दगड घालून व डोके जमीनिवर आपटून जीवंत मारले व तीचे अंगावरील सोन्याचे दाग दागीणे काढून घेतल्याचे कबूली दिल्याने

मौ. साखरा ता.सेनगांव येथील दोन उघडकीस न आलेले खून अखेर उघड झाल्याने सेनगांव परिसरातील लोकांमधील भितीचे वातावरण दूर झाले आहे. सदर आरोपीने वयोवृद्ध महिलांची ओळख करून घेउन त्यांना सरकारतर्फे दिल्याजाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्याचा बहाणा करून त्या एकटया रहात असलेल्याची माहिती घेउन त्यांच्या अंगावरील सोन्या चांदीच्या दागीण्याची माहिती घेत असे व संधी साधून महिलांचा खून करून दागदागीणे लूटत असे. सदरचा आरोपी पकडल्यामुळे भविष्यात अशा अप्रीय घटना घडण्याचा प्रकाराला आळा बसला आहे. सदरचा आरोपी हा नेहमी तहसील कार्यालय व पोलीसांच्या आवती भोवती फिरत रहाणारा असून कायद्याचा जानकार आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकांनद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोउपनि शिवसांब घेवारे, किशोर पोटे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लकुळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, किशोर कातकडे, राजुसिंग ठाकुर, शंकर ठोंबरे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघण, आकाश टापरे तसेच पो.स्टे सेनगांवचे योनि सेनगांव कृष्णदेव पाटील, सपोनि दिक्षा लोकडे, अभय माखणे पोहे खंदारे यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या