डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची दखल जगाने घेण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे. अशा अभिमानास्पद घटना घडत असून यामूळे कट्टर आंबेडकरवादी, बहूजनवादी सामाजाची छाती 'मै भी आंबेडकरवादी' असे म्हणत गर्वाने भरून येत आहे. भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिलला १३० वी जयंती साजरी होत आहे. हा दिवस कॅनडातील ब्रिटीश कोलंबीया या प्रांतात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल 'समता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. Dr. Babasaheb Ambedkar's 130th birth anniversary is being celebrated on April 14. This day will be celebrated on April 14 as 'Equality Day' in British Columbia, Canada on the occasion of Babasaheb's birthday.
कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात १४ एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून साजरा होणार आहे. यानिमित्त ब्रिटीश कोलंबीया राज्य सरकारने लेफ्टटनंट गव्हर्नर आणि अॅटर्नी जनरल यांच्या स्वाक्षरीने एक शुभेच्छा संदेश प्रसिद्ध केला आहे. हा शुभेच्छा संदेश खालील कॅन प्रमाणे आहे.
https://www.bclaws.gov.bc.ca/civix/document/id/proclamations/proclamations/DrBRAmbedkarEqualDay2021
"ज्या अर्थी ब्रिटीश कोलंबिया हे राज्य हा एक बहुसंख्य लोक आणि समुदाय यांचा समावेश असलेला एक वैविध्यपूर्ण प्रांत आहे आणि जिथे आदिवासी, काळे आणि ब्रिटिश कोलंबियामधील लोक व्यवस्थेने घालून दिलेला वर्णद्वेष, अन्याय, भेदभाव आणि द्वेष अनुभवत आहे, आणि ब्रिटीश कोलंबिया सरकार सर्व प्रकारचे वर्णद्वेषाचे निवारण करण्यासाठी वचनबद्ध आहे, आणि ज्याअर्थी १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर जे की एक भारतीय राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, आणि समाज सुधारक होते, ज्यांना "भारतीय संविधानाचे जनक" म्हणून ओळखले जाते, भारतात त्यांचा जन्म झाला आहे आणि ज्यांनी जातीवर आधारित भेदभावविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले आहे, आणि ब्रिटिश कोलंबिया आणि जगभरातील लोकांना प्रेरणा देत असणार्या समानता आणि सामाजिक न्यायासाठी असलेल्या समर्पणाचा त्यांचा वारसा लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्याची मिळालेली संधी म्हणजे डॉ. आर. बी. आंबेडकर यांची जयंती आणि त्यानिमित्त अशी घोषणा करण्यात येते की १४ एप्रिल २०२१ हा दिवस "डॉ. बी. आर. आंबेडकर समानता दिन" म्हणून ब्रिटिश कोलंबिया प्रांतात पाळला जाईल."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस जगभरात आजघडीला साजरा होत आहे. जगभरातील अनेक देशान्मध्ये ज्या ठीकाणी असमानता, रंगभेद, वर्णभेद, वर्गभेद आहे त्या त्या ठीकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. आशियासह युरोप, अमेरिका, अफ्रीका या सर्वच मोठ्या खंडात आंबेडकर पुजनीय झाले आहेत. असे असले तरी बाबासाहेब आंबेडकर यांची देशात म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही. भारतरत्नचा किताब असो की मग जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर करणे असो. यामध्ये भेदभावच होत आला आहे. महापरिनिर्वानानंतर तब्बल ३५ वर्षानंतर भारतरत्न आणि आंबेडकरवादाचा पुरस्कार करणारा त्याना मानणारा वर्ग नाही असा एकही देशाचा कोपरा नसतानाही जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्यास २०२१ (National Holiday On Birth anniversary of Dr. Ambedkar) हे साल उजाडावे लागले. Dr. Babasaheb Ambedkar's 130th birth anniversary is being celebrated on April 14. This day will be celebrated on April 14 as 'Equality Day' in British Columbia, Canada on the occasion of Babasaheb's birthday.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला (Dr. Babasaheb Ambedkar was born on 14 April 1891 at Mau (Now Ambedkar Nagar), Madhya Pradesh). बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला. बाबासाहेब आपल्या शालेय जीवनात १८ तास अभ्यास करत असत. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या असून ते त्यांच्या काळातील जगातील पहिल्या १० पैकी अत्यत महान, प्रकांड पंडीतापैकी एक होते.
ही बाब प्रत्येक भारतीय व्यक्तीचा ऊर भरून आणणारी बाब असली तरी, केवळ भारतीय जातिवादामूळे त्यांच्या विचाराकडे हेतूत: डोळेझाक करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानानंतर कुणी तरी म्हणाले होते की, जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत्यू पावलेले आंबेडकर अधिक धोकादायक राहतील (Dead Ambedkar will be more dangerous than live one). आणि विषमतावादी लोकांची ही भिती खरी ठरली आहे. भारतात आज जो काही सामाजिक उद्रेक दिसून येत आहे, मराठा आंदोलन असो की शेतकरी आंदोलन, सीएए-एनपीआर आंदोलन असो की सर्वच राजकीय पक्षामध्ये निर्माण झालेली हिंदुत्ववाद विरोधी चळवळ, या सर्वांचा मूळस्त्रोत आहे, बंडखोर आंबेडकरवाद !
Tags:
Ambedkar Jayanti
Bahujan
Breaking
British Columbia
Canada Government
Dr. B.R. Ambedkar
international
Jai Bhim
latest
national