"हिंगोली जिल्ह्यात भिमजंयतीला परवानगी द्या"

सुकाणू समितीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

छाया: विजय गुंडेकर
हिंगोली:- जिल्ह्यात नेहमीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करू देण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हा भिमजयंती सुकाणू समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन जयंती परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत शहरासह, गावखेड्यात साजरी करण्याची कायदेशीर शासन नियम लावून परवानगी द्यावी अशी मागणी सर्व पक्षिय व आंबेडकरी संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात पुढे नमुद केले कि, जागतिक कोरोना माहामारीचे संकट असल्याने मागच्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. तेंव्हाची परिस्थिती पाहून भिमसैनिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याची भुमिका घेतली. यावर्षी प्रशासन व सरकारने लग्न संभारभांला ज्या पद्धतीने ५० लोकांच्या उपस्थितीत विविध अटी शर्ती घालून परवानगी दिली. त्याच पद्धतीने भिमसैनिकांच्या भावनेचा आदर करत जिल्ह्यात साजरी होणारी सार्वजनिक २०२१ ची डॉ. आंबेडकर जयंती शहरासह, गावखेड्यात काढण्यासाठी परवानगी द्यावी व तशी भुमिका जिल्हाधिकारी म्हणून जाहीर करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. दिलेल्या अटी, शर्ती, कोरोणा नियमांचे पालन केले जाईल अशी हम्मीपत्र भिमसैनिक देण्यासाठी तयार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जयंती सुकानु समितीने भीम जयंती जल्लोषात साजरी करू देण्यासाठी परवानगी मागितली असली तरी त्यावर न बोलता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी प्रशासनालाच सहकार्य करण्याची विनंती शिष्टमंडळाला केली. त्यामुळे यावर्षी सुद्धा भीम जयंती गेल्या वर्षी प्रमाणेच साधेपणाने साजरी करावी लागण्याची शक्यता आहे. परंतू अनेक भीम जयंती मंडळे मात्र जयंती वाजतगाजत आणि उत्साहात काढण्यावर ठाम असल्याचे वृत्त आहे. त्यामूळे प्रशासनान काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
या वेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार एंगडे, भीमटायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण घोंगडे, ज्येष्ठ नेते सुभाष मस्के, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रावण धाबे, जिल्हा प्रभारी ॲड. सचिन पट्टेबहादुर, भीमटायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्की भालेराव, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित कळासरे, वंचितचे युवा नेते आनंद खिल्लारे, प्रीतम भैया सरकटे, पीआरपीचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश साठे, दलित युथ पँथरचे जिल्हाध्यक्ष युवराज ठोके, गजानन वैद्य, गुड्डूभाऊ इंगळे, सचिन भालेराव, धीरज नरवाडे, चेतन सोळंके, यशवंत साळवे, बाळूभाऊ कुर्हे, अविनाश सरकटे, ज्ञानदीप कुर्हे, अनिल कांबळे, साहेबराव कांबळे,आदिसह मोठ्या संख्येने भिमसैनीक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी भिमजयंती सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले की शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार जयंती साजरी करण्यात यावी आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post