हिंगोलीत होणाऱ्या हळद संशोधन व प्रक्रिया धोरण समितीची पहिली बैठक संपन्न

खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत  महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा

हिंगोली:- हिंगोली येथे नव्याने स्थापन होणाऱ्या हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळाच्या, हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक पुणे येथे समितीचे अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे व जास्त उत्पादन देणारे हळदीचे बियाणे उपलब्ध करून देऊन, हळदीच्या जास्तीत जास्त वाणाच्या जि.आय. नामांकनासाठी प्रयत्न करणे, हळदीला पूरक उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करणे, हळदीमधील कुरकुमिन वाढीसाठी नवीन वाणाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नरत राहून महामंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात येईल तसेच हिंगोली येथे केंद्रीय स्पाईस बोर्डाचे उपकेंद्र मान्यता यासह महत्वाच्या मुद्यांवर बैठकीमध्ये चर्चा झाली.
राज्यात हिंगोली जिल्ह्यात सर्वात जास्त हळद लागवडीचे क्षेत्र असून त्यानुषंगाने खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीच्या हळदीला संबंध देश आणि जगभर बाजारपेठ मिळून आणि उद्योग वाढीसाठी चालना मिळावी याकरिता केंद्रीय वाणिज्य समिती अभ्यासपूर्ण विवेचन पुढे सादर केले . चहा , कॉफी या बोर्डाप्रमाणे हिंगोली येथे हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ असावे याबाबत आग्रही भूमिका घेऊन सातत्यपूर्ण केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून अखेर राज्य आणि केंद्र शासनाने यावर शिक्कामोर्तब केले.

खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतची अभ्यास समिती स्थापन केल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केल्यांनतर समितीची पहिली बैठक ( दि. २६ रोजी ) पुणे येथे खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार , महाराष्ट्र कृषी उत्पन्न बियाणे महामंडळ उपमहाव्यवस्थापक सुनील पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे संशोधक संचालक डॉ. व्ही एस. खंदारे, पुणे पणन महामंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक महेंद्र पवार, हिंगोली कृषी उपसंचालक एस.व्ही. लाडके , डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, राहुरीचे संशोधन संचालक डॉ. प्रफुल्ल माळी , स्पाईसेस बोर्डाच्या निर्यात संवर्धन अधिकारी डॉ. ममता रुपोलिया , हळद संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी, अन्न औषध प्रशासन, पुणे विभाग , सहाय्यक आयुक्त भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीमध्ये हिंगोली या ना उद्योग जिल्ह्यासाठी प्रामुख्याने हळदीच्या संदर्भाने कोणकोणते उद्योग उभारणी करता येईल याबाबत चर्चा झाली, राज्यातील हळदीमध्ये कुरकुमिनचे प्रमाण वाढविण्यासाठी सुधारित जातीची लागवड हळद उत्पादक जिल्ह्यात करण्यासाठी दापोली , राहुरी आणि परभणी कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून संशोधन करून नवीन जातीचे वाण निर्माण करणे, कमी खर्चात हळदीचे जास्त उत्पन्न कश्या प्रकारे घेता येईल संदर्भाने संशोधन करण्याची जबाबदारी राज्यातील या प्रमुख कृषी विद्यापीठावर निश्चित करण्यात आली. हळद प्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधने शेतकऱ्याना कमी खर्चात आणि सबसिडीच्या माध्यमातून उपलब्ध व्हावीत याकिरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून अनुदानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे ठरले. हिंगोलीची हळद जास्तीत जास्त निर्यात करण्याच्या संदर्भांत चर्चा झाली . नवीन बियाणांच्या जि. आय. नामांकनासाठी कॉमर्स कमिटी आणि स्पाईस बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात येईल आणि जास्तीत जास्त वाण नामांकनासाठी पाठवून नामांकन मिळवून घेण्याची जबादादरी सोबतच ते वाण हंगामाच्या कालखंडात शेतकऱ्यांना कश्या प्रकारे उपलब्ध होतील याबाबत प्रयत्न करण्यात येतील असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

हळदीचे मुख्य कार्यालय हिंगोली येथे करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रस्तावाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. तसेच ज्या राज्यांमध्ये हळदीचे उत्पादन जास्त होते त्या ठिकाणी हळद उत्पादक शेतकरी, शास्त्रज्ञ, यांचे अभ्यास दौरे करण्यात येतील यावर सुद्धा शिक्का मोर्तब करण्यात आले. शेतकरी हित लक्षात घेऊन कुरकुमिनचे प्रमाण जास्त असणारे बियाणे कमी खर्चात कसे उपलब्ध करून देता येईल याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. तसेच स्पाईस बोर्डाचे उपकेंद्र हिंगोली येथे स्थापन करण्यात सुद्धा चर्चा झाली . हळद बोर्डाच्या अनुषंगाने जे केंद्र आणि राज्यसरकार यांच्याकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी खासदार हेमंत पाटील यांनी घेतली. याकरिता लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील यावर सुद्धा चर्चा झाली.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post