'त्या' मुलीच्या खून प्रकरणात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून


आखाडा बाळापूर:- कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा परिसरातील नऊ वर्षाच्या मुलीच्या खून प्रकरणात चौकशीला वेग आला असून दोन दिवसापासून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत, आतापर्यंत १७० जणांची चौकशी करून ठसे नमुने घेण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की राजस्थान राज्यातील काही कुटुंबे उदरनिर्वाहाच्या निमित्ताने आखाडा बाळापुर परिसरातील कामठा शिवारामध्ये वास्तव्यास आले होते. परिसरातील लोकांचे मनोरंजन करून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबातील रेश्मा गुड्डू शहा ही नऊ वर्षीय मुलगी २२ फेब्रुवारीपासून हरवली होती, की तिचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत कुटुंबियांनी शंका निर्माण केली होती. त्यानंतर तब्बल नऊ दिवसानंतर सदरील मुलीचा प्रेत कामठा येथील १३२ केव्हीच्या पाठीमागील विहिरीत मृतदेह आढळला होता. त्यावेळी सदर मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले होते.

यावेळी तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दिसून आले होते. या प्रकरणात मुलीचा खून झाल्याचा आखाडा बाळापूर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास रॉयलवार, नागोराव वाबळे, सुरेश नागरे, पंढरीनाथ चव्हाण यांच्या पथकाने दोन दिवसांपासून घटनास्थळी तळ ठोकुन संशयास्पद वस्तूची, जागेची पाहणी केली तसेच ज्या विहिरी मध्ये सदर मुलीचे प्रेत सापडले होता त्या विहिरीचं संपूर्ण पाणी काढून त्यामध्ये पाहणी करण्यात आली आहे. त्या विहिरी मध्ये मयत मुलीचे केस सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच कुटुंबीयांच्या नातेवाईक असलेल्या व त्या परिसरात गावात काही संशयास्पद असलेल्या व्यक्तींचे ठसे घेण्यात आले. 

खून झालेल्या मुलीचा प्रकरणाला वेग आल्याने लवकरच त्याचा तपास लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच दोन पथके रवाना करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोहीलावर, यांच्या पथकाने परिसरात काही सापडते का यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. तसेच मयत मुलीचे कपडे प्रयोग शाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post