आदिवासी विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रदीप पोळ, तर विभागीय अध्यक्ष आत्माराम धाबे

पुसद:- महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकारी यांनी दिनांक १४ मार्च २०२१ रोजी कॉन्फरन्स द्वारे एकत्रित येऊन स्वतःच्या हक्कासाठी लढा देण्याकरिता, संघटीत होण्याकरिता आदिवासी विकास विभाग राजपत्रित अधिकारी यांची राज्यस्तरीय संघटन कार्यकारिणीची स्थापना करण्यायात आली.
छायाचित्र: डावीकडून अनुक्रमे पोळ, धाबे, रामटेके.
आदिवासी विकास विभागाअंतर्गत काम करीत असताना येणाऱ्या अडचणी, अडथळे यावर मात करण्याकरिता पुढील काळाची गरज ओळखून संघटीत होणे, स्वतःकरीता एक व्यासपीठ निर्माण करुन येणाऱ्या समस्या सर्व मिळून सोडविणे अत्यंत आवश्यक आहे, असा या ऑनलाईन सभेचा सूर होता. सदर ऑनलाईन सभेमध्ये राज्यस्तरीय संघटनेच्या कार्यकारीणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सदर संघटनेची कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष म्हणून प्रदीप पोळ, उपाध्यक्ष ठाणे विभाग विजय मोरे, नाशिक विभाग संतोष ठुबे, अमरावती विभाग आत्माराम धाबे, नागपूर विभाग नयन कांबळे, सचिव सुरेश रामटेके, सरचिटणीस अरुणकुमार जाधव, प्रवक्ता प्रदीप देसाई, कोषाध्यक्ष श्रीमती शशिकला अहिरराव, संघटक गोदाजी सोनार व प्रमोद पाटील, प्रसिद्धी प्रमुख कु. रोषना चव्हाण व कु. गितांजली निकम वरील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.

सदर ऑनलाईन सभेचे आयोजन नितीन इसोकर यांनी केले तर प्रास्ताविक सुरेश रामटेके यांनी केले. आभार प्रदर्शन अरुण पवार यांनी केले. संघटनेच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देऊन तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून ऑनलाईन सभेची सांगता करण्यात आली.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने