विजेची तार अंगावर पडून बाप-लेकाचा मृत्‍यू

वसमत:- शहरा जवळीक रोड भागात वीटभट्टीवर काम करणाऱ्या बाप-लेकाच्या अंगावर विजेची जिवंत तार पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी ८ वाजता घडली.
कवठा रोड भागात असलेल्या वीटभट्टीवर नांदेड जिल्ह्यातील बेटसावंगी येथील रामदास किशन सोनटक्के व त्यांचे कुटुंबीय कामाला आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रामदास किसन सोनटक्के (वय ५५) व त्यांचा मुलगा पांडुरंग रामदास सोनटक्के (२६) त्यांची पत्नी राणी सोनटक्के व अन्य एक मुलगा कामासाठी आले होते. यावेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला. पंधरा मिनिटांनंतर पुन्हा वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर अचानक वीज वाहिनीमध्ये स्पार्किंग होऊन वीजवाहिनी तुटली आणि रामदास सोनटक्के यांच्या पायात अडकली तर तेथेच असलेल्‍या पांडुरंग यांच्या हातावर वीज वहिनीचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वसमत पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरिक्षक खार्डे, जमादार भगीरथ सवंडकर, चाटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहेत.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने