Emergency Landing: एका प्रवाशासाठी भारतीय विमानाचं थेट पाकिस्तानात लँडिंग; पायलटने निर्णय घेतला

कराची:- विनाम प्रवास करताना अपघात किंवा इतर आकस्मिक घटना अनेकदा घडल्या आहेत. या घटना घडू नयेत म्हणून अनेकदा विमानांची इमर्जन्सी लँडिंग करावी लागते. तसाच एक प्रकार भारतीय विमानासोबत झाला आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या 6E-1412 विमानातील प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानचालकाला आपले विमान चक्क पाकिस्तानमध्ये (Pakistan) उतरवावे लागले.
भारतीय विमानाच्या पायलटने पाकिस्तानी एयर ट्रॅफिक कंट्रोलरशी बातचित करुन हे विमान पाकिस्तानमधील करीची विमानतळावर उतरवले. मात्र, दुर्देवाने प्रवाशाचा जीव वाचू शकला नाही. पाकिस्तानात उतरलेले विमान इन्डिगो एअरलाईनचे (Indigo Airlines) होते. (Indigo airplane makes emergency landing in Pakistan Karachi to save the passenger but he not survived)

भारत आणि पाकिस्तानचे ताणलेले संबंध सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, 6E-1412 हे विमान संयुक्त अरब अमीरातीतील शारजाह (Sharjah, UAE) येथे जात असताना एका प्रवाशाची प्रकृती अचाकन बिघडली. हा प्रकार पायलटला समजल्यामुळे त्याने विमानाला उतरवण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या भूमिपासून कित्येक किलोमिटर लांब आल्यामुळे नेमकं कुठं उतरावं हे त्याला समजत नव्हते. शेवटी पायलटने निर्णय घेत पाकिस्तानमधील कराची विमानतळावर विमान उतरवण्याचे ठरवले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने