माधव हॉस्पिटल येथे ३२५ जेष्ठनागरिकांना लसीकरण

देवडा बँकेचा पुढाकार, जयवंशी यांच्या हस्ते उदघाटन


हिंगोली - येथील सहकाररत्न ओमप्रकाश देवडा यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्य शहरातील ३२५ जेष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधित लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.

येथील माधव हॉस्पिटल येथे गुरुवारी (ता.४) ओमप्रकाश देवडा यांच्या सहाव्या पुण्यतिथीचे अवचित्य साधून दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. परंतू यंदा कोरोना संसर्ग पाहता शहरातील जेष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधित लस देण्याचा निर्णयबँकेचे अध्यक्ष सुनील देवडा यांनी घेतला. त्यानुसार दोनशे नागरिकांची नोंदणी देखील केली होती. परंतू नागरिकांचा प्रतिसाद पाहता जवळपास आज ३२५ नागरिकांना लस देण्यात आली. आता ५०० डोज चे उद्दिष्ट समोर ठेवून उर्वरित नागरिकांना ही लस शुक्रवारी देण्यात येणार आहे.यावेळी मातोश्री गंगादेवी देवडा अंध विद्यालयातील शाळेतील अंध शिक्षकांना प्रामुख्याने लस देण्यात आली.

यावेळी प्रारंभी स्व.ओमप्रकाश देवडा यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा समाज कल्याण आयुक्त एस. के. मिनगिरे पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा,मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर जोशी, उपसरव्यवस्थापक शशिकांत कंदी,बद्रीनारायन बगडीया ,उपाध्यक्ष प्रकाशचंद सोनी , संचालक शशिकांत दोडल ,ज्ञानेश्वर मामडे ,राजेश अग्रवाल, आशिष काबरा,डॉ. सचिन बगडीया ,डॉ.कांचन बगडीया ,डॉ.

बनवारीलाल बगडीया ,नंदकिशोर भालेराव, आशिष पिंगळकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशसस्वीतेसाठी सुनील थोरात ,मारोती सूर्यवंशी, अखिलेश यादनिक,धोंदुअप्पा रनखांब,संदीप सावळे,ऋषिकेश पांचाळ ,रामचंद्र श्रीखंडे,यांनी परिश्रम घेतले तर संचालन संजय बोहरा यांनी केले.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post