Corona: हिंगोलीत नव्याने ४४ रुग्ण पॉझीटीव्ह

हिंगोली:- जिल्ह्यात गुरुवारी नव्याने ४४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचा अहवाल प्राप्त आला असून, ३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली.

गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत तीन रँपीड टेस्ट तर ४१ रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. ३३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण चार हजार २७५ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी तीन हजार ८९२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ३२२ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ६१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला.

कोविड सेंटरच्या कोसळलेल्या छताच्या प्लास्टरची जयवंशी यांच्याकडून पाहणी

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटर मधील छताचे प्लास्टर बुधवारी कोसळल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

येथील सामान्य रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक इमारतीची कामे करण्यात आली. आणखी ही सुरु आहेत.मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षणामुळे कंत्राटदाराने कामाचा दर्जा हा गुणवत्ता पूर्ण असला पाहिजे असे सांगून बोगस कामे कराल तर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान गुरुवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या सेंटर मधील रुग्णांना इतरत्र हलविण्याच्या सूचना दिल्यानंतर सर्व खाटा हलविण्यात आल्या आहेत.कामाचा दर्जा राखा, गुणवत्ता पूर्ण कामे करा ,स्वछता ,रुग्णांना मुबलक पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे ,यासाठी लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी डॉ. दीपक मोरे, अधिपरीचारिका ज्योती पवार आदींची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post