पनवेलमध्ये मायलेकींची हत्या करणाऱ्याने आपल्या गावी येवून केली आत्महत्या...

हिंगोली:- पनवेल (जि. रायगड) तालुक्यातील दापोली येथे लग्नाच्या कारणावरून मायलेकींची हत्या करून फरार झालेल्या आरोपीने आपले गाव हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे येऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याने आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पहेणी गावाजवळील शिवारात आत्महत्या केली असून त्याच्या मृत्यूमुळे एका मोठ्या आणि क्रूर गुन्ह्याचा शेवट झाला आहे.
प्रकाश यशवंत मोरे असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरेखा सिद्धार्थ बलखंडे (आई) आणि सुजाता सिद्धार्थ बलखंडे (रा. रुपुर ता. कळमनुरी, ह. मु. दापोली, पनवेल ) या मायलेकींची त्याने हत्या केली होती. सुजाताचे माझ्यासोबत लग्न लावून द्या अशी त्याची मागणी होती. उदरनिर्वाहासाठी मुंबईला गेलेल्या कळमनुरी तालुक्यातील रुपूर येथील कुटुंबातील आई अन् मुलीची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची ग्रामस्थांनी केली होती मागणी...

माझ्या आई व बहिणीची एवढ्या निर्दयीपणे हत्या केली, दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तर त्यांचा गळा कापणारे चाकूदेखील त्यांच्या अवतीभोवती पडले होते. घरात सर्वत्र रक्त सांडले होते. हे विदारक दृश्य डोळ्यांसमोरून अजूनही जात नाही. आई अन् बहिणीचा चेहरा हा डोळ्यात बसलेला आहे. त्यामुळे असे घोर कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे म्हणून स्वाती रडत होती. याबाबत ग्रामस्थांनी कळमनुरी येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होण्यापूर्वीच आरोपीने फाशी घेवून आत्महत्या केल्याने पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असला तरी काहीही चूक नसताना आपल्या घरातील दोन माणसे गेल्याचे मोठे दुःख बलखंडे कुटुंबावर पडले आहे.
बलखंडे कुटुंबावर दबाव

सुरेखा सिद्धार्थ बलखंडे (आई), सुजाता सिद्धार्थ बलखंडे (मुलगी) अशी मृतांची नावे आहेत. बलखंडे कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील दापोली येथे कामानिमित्त स्थलांतरित झाले होते. तेथे राहून मिळेल ते काम करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह भागवित होते. त्यांच्याच चाळीत हिंगोली जिल्ह्यातील पहेनी येथील प्रकाश यशवंत मोरेदेखील राहत होता. प्रकाशचे लग्न झाले होते, मात्र त्याच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याने सिद्धार्थ बलखंडे यांच्या सुजाता नावाच्या मुलीला लग्नासाठी अनेकदा मागणी घातली होती. मात्र सुजाताचे शिक्षण सुरू असल्याने बलखंडे कुटुंब यावर विचार करीत होते. मात्र प्रकाश लग्नासाठी बलखंडे कुटुंबावर नेहमी दबाव टाकत असे, त्याच्या या प्रकाराला बलखंडे कुटुंब चांगलेच हादरून गेले होते.

फोटो केले व्हायरल

कंटाळलेल्या सुजाताच्या आईने शहर पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तर पोलिसांनी सुजाताच्या आईची समजूत घालून किरकोळ १०७ कलमाचा गुन्हा नोंद करून पाठवून दिले. मात्र या गुन्ह्यामुळे प्रकाशवर काहीही परिणाम झालेला नव्हता. तो मुलीचे फोटो व्हॉट्सअ‌ॅपवर व्हायरल करीत असल्याने सुजाताची आई सुरेखा हिने कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र काहीही झाले नाही. त्याने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घरात शिरत लग्नाची मागणी केली. मात्र नकार मिळाल्याने त्याने चाकूने वार करायला सुरुवात केली. सिद्धार्थने हात पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यालाही लोटून दिले. त्यामुळे सिद्धार्थने बाथरूममधील खिडकीतून उडी मारून घर मालकाकडे धाव घेतली. यानंतर तो समोरून घरात येईपर्यंत सुजाता आणि तिची आई या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यामुळे ते हादरून गेले.

दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

शेजारीच असलेल्या प्रकाश यशवंत मोरेने दोघी माय-लेकींवर हल्ला केला. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात प्रकाश यशवंत मोरेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पथक आरोपीच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले असतानाच आरोपीने हिंगोली तालुक्यातील त्याचे गाव पहेणी येथे येवून गावाशेजारील वैजापूर शिवारात आत्महत्या केली.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post