सर्व पँथरची मोट बांधणार, औरंगाबादेत होणार अधिवेशन: ॲड. रमेशभाई खंडागळे

औरंगाबाद:- भारतीय दलित पँथरच्या पुनर्गठणाची चौथी बैठक ५ जानेवारी रोजी नांदेड येथे झाली. या बैठकीत पँथरचे अधिवेशन औरंगाबाद येथे घेण्यात यावे असे ठरले. हे अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारी २०२१ रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद येथे घेण्यात येणार असल्याचे पँथरचे प्रमुख संयोजक अँड. रमेशभाई खंडागळे यांनी सांगितले.
यासंबधी त्यांनी सांगितले की, देशात जातीयवादी सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, ओबीसी आणि आदिवासी त्याचप्रमाणे अल्पसंक्षयाक समाजावर अन्याय अत्याचार खुप बाढले असून १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अन्याय अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी पँथरची पूर्वीपेक्षाही आज खुप आवश्यकता आहे. यासाठी पँथरचे सर्व छोटे मोठे ग्रूप एकत्र करुन पृँथरची एकच व शक्तिशाली संघटन बनविण्यासाठी आम्ही पँथरच्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन सर्वांशी संपर्क केला व विचारांती नांदेड येथे झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक अधिवेशन औरंगाबादसारख्या ऐतिहासिक व आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या शहरात घेण्याचे निश्चीत करण्यात आले.

या निर्णयानुसार दशरथ लोहबंदे, दिंगबर मोरे, एन.डी.गवळे, रमेशभाऊ सोनाळे, डी डी वाघमारे (नांदेड), संजय कांबळे, अशोक कांबळे, किशोर कांबळे (लातूर), आयुष्यमान माने (उस्मानाबाद), शे. खुर्शीदभाई, स्वप्निल ब्रम्हराक्षे, मधुकर काळे (परभणी), अँड. शिवाजी आदमाने, अँड. किशोर चतरे (जालना), अँड.रमेशभाई खंडागळे, प्रा. अंबादास ढोके, ओमपाल ‘चावरीया (औरंगाबाद), प्रा. अमर पांडे , प्रा. अमोल वेटम (सांगली), भिकाजी इंगळे, प्रा.बाबूरव गायकवाड, अशोक वानखेडे,(बुलडाणा), सूर्यकांत शिंदे (अहमदनगर),

रामचंद्र माने, प्रा. दीपक गायकवाड (पुणे) त्याचप्रमाणे विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक कार्यकर्त्याशी तसेच महाराष्ट्राबाहेर गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब येथील पँथरमध्ये सक्रिय असलेल्या कार्यकर्त्याशी संपर्क व संवाद करुन हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. गुजरातचे राहुलभाई परमार, दिल्लीचे अँड. विकास फकिडे, उत्तरप्रदेशचे साथी धनीराम सिंह यांना अधिवेशनास आमंत्रित करण्यात आले आहे.

या अधिवेशनास कार्यकर्त्यांनी व जनतेनी मोठ्या संख्येने सामील होऊन हे अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन रामेश्वर निकाळजे, संभाजी साबळे, अशोक श्रीखंडे, माणिक पगडे, मधूकर घोरपडे, सिध्दार्थ ठोकळ, गणेश चव्हाण, भय्यासाहेब चव्हाण, सुनील निंभोरे, रमेश पवार, शिवाजी पाचरणे, हिरालाल मगरे,एकनाथ त्रिभूवन, अनिल साळवे, बंडू तुळवे, संजय चिकसे, प्रा. संतोष डोंगरे, उमेश सरदार, साईनाथ जंगम यांनी केले आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने