जातिवाद्यांच्या दबावामुळे प्रशासनाने निळा झेंडा आणि आंबेडकर चौकाचे नामफलक हटविले; सेनगावात प्रचंड तणाव

सेनगाव:- जातीयवादी हिंदुत्ववाद्यांनी निर्माण केलेल्या दबावामुळे येथील तहसील कार्यालया समोर लावण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचे नामफलक आणि निळा झेंडा सेनगाव प्रशासनाने हटविला. श्याम त्यामुळे सेनगाव येथे आंबेडकरवादी समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून प्रशासन सुद्धा जातिवाद लोकांच्या दडपणाखाली काम करीत असल्याने सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
रास्ता रोको करतांना आंबेडकरी समाज.
सेनगाव येथे तहसील कार्यालयाच्या समोरील चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामफलक उभारून त्या ठिकाणी निळा झेंडा लावण्यात आला होता. या झेंड्याला गावातील हिंदुत्ववादी लोकांनी विरोध करून हा फलक आणि झेंडा काढण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले आहे.
रविवारी लावलेले हेच नामफलक आणि झेंडा हटविण्यात आला आहे.
सेनगाव येथे अनेक मोक्याच्या ठिकाणी महापुरुषांच्या नावाने चौक स्थापन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चौक अगोदर स्थापन करण्यात आले आणि त्यानंतर नगर पंचायत आणि तत्कालीन ग्रामपंचायती मधुन तसे ठराव संमत करण्यात आले आहेत. भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुद्धा मोक्याच्या ठिकाणी चौक असावा अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यामुळे सेनगाव आणि परिसरातील आंबेडकरवादी जनतेने सेनगाव तहसील कार्यालया समोरील चौकात रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा नामफलक उभारून त्या ठिकाणी निळा झेंडा लावला.

आंबेडकरी जनतेला पडलेले प्रश्न...

१. प्रशासन जातीयवादी नाही, तर मग त्यांनी निळा झेंडा आणि नामफलक उभारला त्याच वेळी ते हटविण्याची कारवाई का केली नाही?

२. पोलिसांच्या समोरच विरोधी गट, शांततामय मार्गाने रास्ता रोको करणाऱ्या आंबेडकरवाद्यांच्या अंगावर धावून आल्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही?

३. विरोधी गटाने मागणी केल्यानंतरच प्रशासनाने संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेला नामफलक आणि निळा झेंडा का हटविला?

४. सेनगाव येथील सर्वच अवैध चौक आणि त्यावरील झेंडे, नामफलक प्रशासनाच्या वतीने हटविण्यात येणार आहेत का?

५. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करणाऱ्यांवर, नामफलकाची विटंबना करणार्‍यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करणार का?
हा झेंडा पाहताच सेनगाव येथील जातिवाद लोकांचे पित्त खवळले आणि रविवारी रात्री काही जातीयवादी तरुणांनी या नामफलकाची विटंबना केली. त्यानंतर सेनगावातील आंबेडकरवादी जनता पोलीस ठाण्यात जमा झाली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तर आज दिवसभर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरवादी पक्ष संघटनांचे नेते जमा झाल्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात आला. यादरम्यानच जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत हातात भगवे झेंडे घेवून विरोधी तरुणांचा एक जथा रास्ता रोकोच्या ठिकाणी दाखल झाला. या घोषणाबाजीला प्रत्युत्तर म्हणून आंबेडकरवादी गटाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, जय भीम, अशी घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान काही वाहनांची तोडफोड झाल्याचे आणि आंबेडकरवादी नेत्यांसोबत झटपट केल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
त्याठिकाणी राजमाता जिजाऊ चौक असल्याचा दावा...

ज्याठिकाणी आंबेडकर चौक दामू फलक लावण्यात आला आहे त्या ठिकाणी जिजाऊ चौक होता असा दावा विरोधी गटाच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत सकल सेनगावकर या गटाच्या वतीने पोलीस निरीक्षक, सेनगाव यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर ९ जणांच्या स्वाक्षर्‍या असून आंबेडकर चौकाचा नामफलक तात्काळ काढण्याची मागणी त्यांनी केली होती. तर आंबेडकरी समाजाच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी गेल्या ८ ते १० वर्षात कोणत्याच महापुरुषाच्या नावाने चौक नव्हता किंवा त्याबाबत ग्रामपंचायतीने तसा ठराव सुद्धा घेतलेला नव्हता.
दोन्ही गट सामने सामने आल्यानंतर आणखी वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही गटांना तसेच अधिक पोलीस कुमक बोलावून घटनास्थळी चोख बंदोबस्त लागू केला. उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश देशमुख आणि त्यांचे पथक घटनास्थळी सायंकाळी उशिरापर्यंत दाखल होते. तर तहसील, नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने जातीवादी तरुणांनी केलेल्या प्रचंड विरोधामुळे निळा झेंडा आणि फलक त्या ठिकाणाहून काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन सुद्धा जातीवादी समूहांच्या बाजूने असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या कारणामुळे शेन गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

1 टिप्पण्या

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

  1. जातीयवादी मानसिकता आजही काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांमध्ये जिवंत असल्याचे दिसून येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या नावाला विरोध करणारी विषारी अवलाद जिवंत गाडने गरजेचे आहे .महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज , संत गाडगे महाराज,संत तुकाराम महाराज ,संत रविदास महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई,या महापुरुषांच्या नावाने महाराष्ट्र हा पुरोगामी महापुरुषांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो तरी ही काही गावा गावात जातीवादी विचारसरणीच्या औलादी बेफामपणे वागत असल्याचे दिसून येते आणि प्रशासन देखील यांना सहकार्य करते ही लाजिरवाणी गोष्ट आहे .मनुवादी विचारसरणीच्या जातिवाद्यांना रोकने गरजेचे आहे नसता आंबेडकरी जनता खपवून घेणार नाही .
    ॲड. केशव भालेराव माजी अध्यक्ष वकील संघ सेनगाव.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने