Motorola E7 Power: 6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि किंमत फक्त 8299 रु., 26 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी बाजारात

मुंबई:- मोटो, मोटोरोला कंपनीचे मोबाईल वापरणारे आणि मोटो प्रेमींसाठी एक नवीन किफायतशीर स्वस्त आणि चांगल्या हार्डवेअर सॉफ्टवेअरसह Motorola मोटो ई 7 पॉवर (Moto E7 Power) हा स्मार्टफोन आज (19 फेब्रुवारी) भारतात लाँच केला आहे. मोटोरोला ने भारतात लॉन्च केलेल्या या मोबाईलची किंमत 8 हजर 299 रुपये आहे.
हा नवा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवरील टीझरमध्ये पाहावयास मिळाला आहे. दरम्यान लीक्सच्या माध्यमातून या फोनमधील स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि बॅटरीबाबतची माहिती यापूर्वीच समोर आली होती. (Moto E7 Power Launched in India on 19 February 2021 via Flipkart and the mobile will be available for purchase from 26 February 2021)

आतापर्यंत मोटोरोलाने त्यांच्या ई सिरीजमधील स्मार्टफोन खूपच किफायतशीर किंमतीत सादर केले आहेत. Moto E7 Power हा स्मार्टफोनदेखील किफायतशीर किंमतीत सादर केला आहे. या फोनची किंमत 2 GB RAM आणि 32 GB इंटरनल मेमोरीसाठी किंमत जाहीर केली नाही. परंतु केवळ 7 हजार रुपयांमध्ये हा मोबाईल मिळेल. तर 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल मेमोरीसाठी केवळ 8 हजार 299 रुपये मोजावे लागणार आहेत. हे किंमत मोटोरोला कंपनीने फ्लिपकार्ट (Flipkart website) या वेबसाईटवर जाहीर सुद्धा केली आहे. Moto E7 पॉवर हा स्मार्टफोन भारतात 5000mAh च्या बॅटरीसह लाँच केला असून E7 Power या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 चिपसेट (Mediatek Helio G25 chipset) दिला आहे. माहितीनुसार या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स मिळणार असून ते मोटो मोबाईलची खास वैशिष्ट्ये आहेत.
Moto E7 Power या फोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले दिला आहे जो वॉटड्रॉप नॉचसह सादर केला जाईल. यामध्ये स्टँडर्ड 60Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 OS वर काम करीत असून भविष्यात त्याला पुढील अपडेट मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा दिला असून सोबत सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय चांगल्या दर्जाचे ब्लूटूथ, दोन अन्टेना असलेले मिमो Mimo वायफाय कनेक्शन असे सुद्धा असणार आहे. या या मोबाईल मध्ये गुगल (Google Assistant) असिस्टंट साठी स्वतंत्र बटन देण्यात आले आहे तसेच आकस्मित रित्या पाणी आणि धुळीपासून बचाव होण्यासाठी हा मोबाईल आई IP52 रेटेड बनावट रचना दिली असून यामुळे पाणी आणि धुळीपासून या मोबाईलचा बचाव होणार आहे.

एवढ्या कमी किमतीत चांगले हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मोठी डिस्प्ले स्क्रीन साइज, मोठी बॅटरी दर्जेदार बांधणी दर्जा इतर कोणतीही कंपनी देऊ शकणार नाही असे मोटोरोला इंडियाने हे उत्पादन बाजारात आणले आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल फोन शंभर टक्के मेड इन इंडिया (Made In India, Make In India) असून त्याचे संपूर्ण उत्पादन, रचना हे भारतात झाले आहे.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post