Death Sentence: देशात प्रथमच एका महिलेला होणार फाशीची शिक्षा.....

नवी दिल्ली:- स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम (Shabnam will be first women in Independent India to be hanged along with her lover Saleem ) या महिलेनं २००८ साली आपल्या प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता. या प्रकरणात शबनमला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
राष्ट्रपतींनीही तिचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी होईल. फाशीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. निर्भया प्रकरणातल्या आरोपांना फाशी देणारा पवन जल्लादचीच या फाशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. फाशीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही.
मथुरा जेलमध्ये जवळपास दीडशे वर्षांपूर्वीच महिला फाशीघर बनवण्यात आलं पण तिथे आत्तापर्यंत कोणाही महिलेला फाशी दिली नाही. मात्र आता इथे शबनमला फासावर लटकवण्यात येईल. पवन जल्लादने दोन वेळा या फाशीघराचं निरीक्षण केलं आहे. त्याला त्यात फाशीचं तख्त आणि लिव्हरमध्ये काही दोष जाणवले आहेत. ते तातडीने दुरूस्त केले जात आहेत. बिहारमधील बक्सरमधून फाशीसाठी दोरखंड मागवण्यात आला आहे.
या घटनेमध्ये शबनमचे आई वडील भाऊ रातील लहान मुले अशा 7 नातेवाईकांना कुर्‍हाडीने मारून टाकण्यात आले होते. ही घटना १४-१५ एप्रिल २००८ रोजी घडली होती. उत्तर प्रदेशातील हसनपुर तालुक्यातील अमरोहा येथे घडलेल्या या घटनेत ७ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निकालाला कायम ठेवत शबनम आणि तिचा प्रियकर सलीम यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती तर आता राष्ट्रपतींनी तिची दया याचिका फेटाळली आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने