सेवानिवृत्ती निमित्त सुधाकर बल्लाळ यांचा सत्कार; मुलांच्या वसतिगृहासाठी 51 हजाराची मदत

हिंगोली:- येथील माणिक स्मारक आर्य विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर बल्लाळ हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. रविवारी सेवा गौरव समितीच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मराठा सेवा संघाच्या वसतिगृहासाठी 51 हजाराचा निधी दिला आहे.
सेवा गौरव समितीच्यावतीने सुधाकर बल्लाळ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना साथरोगाच्या पार्श्वभुमिवर सदरील कार्यक्रम रद्द करुन सेवागौरव समितीच्यावतीने छोटेखानी सत्कार करण्यात आला. बल्लाळ यांनी सेवानिवृत्तीनिमित्त अवांतर खर्च न करता मराठा सेवा संघाच्यावतीने गोरगरीब होतकरु मुलांसाठी बांधकाम सुरु असलेल्या वसतिगृहासाठी 51 हजार रुपयाचा धनादेश दिला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडेराव सरनाईक प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक अर्धापुरकर यांच्यासह प्रा. माणिक डोखळे, परसराम हेंबाडे, माधव जाधव, गोविंद घनतोडे, एस.एम. राऊत, सौ. किरण वाबळे, सौ. गंगासागर बल्लाळ यांच्या उपस्थितीत शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन हरिभाऊ मुटकुळे व सुधाकर मेटकर तर सन्मानपत्राचे वाचन पंडित अवचार तर आभार पंडित शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार वायचाळ, डॉ. नामदेव सरकटे, सुरेश मईंग, दिपक जगताप, प्रकाश ठाकरे, विजय पवार, विश्वास वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या