Govt. Jobs and Recruitment: इंडियन ऑईलमध्ये 346 पदांसाठी निघाली भरती...

नवी दिल्लीः आपण जर सरकारी नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी मोठी बातमी आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड ((Indian Oil Corporation Limited, IOCL) ने अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. IOCL अंतर्गत एकूण 346 पदांची भरती करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार IOCL https://iocl.com/ च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्याच वेळी या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. (Job Iocl Recruitment 2021 Indian Oil Recruitment For 346 Apprentice Posts Apply By 4 March)
महत्वाच्या तारखा..... 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – 5 फेब्रुवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 7 मार्च 2021
लेखी परीक्षेची तारीख: 21 मार्च 2021
वयोमर्यादा आणि फी

IOCL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करण्याची किमान वयोमर्यादा 18 वर्षे असावी. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत जास्तीत जास्त वयोमर्यादा 24 वर्षे असणे आवश्यक आहे. याशिवाय आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार शिथिलता देण्यात येणार आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की लेखी परीक्षा मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, रायपूर, पंजिम आणि सिल्वासा येथे घेण्यात येईल. त्याच वेळी, अ‍ॅप्रेंटिसशिप पोस्टवर उमेदवारांच्या प्रशिक्षणाचा कालावधी 12 महिने असेल. याशिवाय अधिक माहितीसाठी उमेदवार IOCLच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकतात. IOCL Recruitment 2021
निवड अशी केली जाईल?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील उमेदवारांच्या गुणांच्या आधारे केली जाईल (कालावधी 90 मिनिटे) लेखी परीक्षेत ऑब्जेक्टिव टाईप मल्टिपल चॉईस प्रश्न (एमसीक्यू) सह 100 प्रश्न असतील, त्यासह चार पर्याय असतील. एक योग्य निवड. प्रश्नपत्रिका दोन्ही भाषांमध्ये विचारल्या जातील. याचा अर्थ ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये असेल. IOCL Recruitment 2021.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या