सेनगाव प्रकरणात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल

हिंगोली:- सेनगाव येथे तहसील कार्यालयसमोर उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या नामफलक आणि निळा झेंडा विटंबना प्रकरणानंतर आंबेडकरवादी संघटनांनी निषेध मोर्चा काढला होता या मोर्चा दरम्यान आंबेडकरवादी आणि विरोधी गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत सेनगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निषेध मोर्चात सहभागी झालेले रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे, अशोक इंगळे, विनोद खंदारे, दिलीप लाटे, ओमप्रकाश देशमुख, समाधान खंदारे, अभिजीत खंदारे, संजय वाघमारे, संदीप सुतार, वसंता वैराट यांच्यासह 32 आरोपी व्यतिरिक्त इतर 90 अज्ञात आरोपींविरुद्ध पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 149, 341, 431, 117, 188, 271 यासह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 51 (बी), आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व सार्वजनिक संपत्ती आणि प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याशिवाय पोलिसांनी आंबेडकर वाद्यांच्या रास्ता रोको आंदोलनाच्या विरोधात प्रतिमोर्चा काढणाऱ्या विरोधी गटाच्या सुमारे ३० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अजय देशमुख, अमोल तिडके, प्रशांत देशमुख, राजू खडे, पांडुरंग देशमुख, अंकूश तिडके, सतीश गाढवे यांच्यासह इतर 20 ते 25 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 143,147,148,188,271, मुंबई पोलीस कायदा कलम 135, 51 (बी) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेमुळे सेनगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा तणाव होता. तणाव असला तरी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणातीही विपरीत घटना घडली नाही.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने