हिंगोली:- येथील कमलानगर भागातील तरुणाच्या खून प्रकरणातील सह आरोपीला येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बालाजी चंद्रभान दिपके असे या आरोपीचे नाव आहे.
वैभव वाठोरे या तरुणाचा चांगेफळ शिवारात खून झाला होता. त्या गुन्ह्यात हा सहआरोपी आहे. या प्रकरणात नरसी नामदेव पोलिसांनी आरोपपत्र नुकतेच न्यायालयात दाखल केले असून त्यानंतर न्यायालयात आरोपीचे वकील ॲड. प्रबुद्ध तपासे यांनी जामीन अर्ज दाखल करून युक्तिवाद केला.त्यावर न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी १५ फेब्रुवारी रोजी निकाल दिला असून आरोपीला जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.