संपादकावररील भ्याड हल्ल्याचा हिंगोलीत निषेध

हिंगोली - बातमी का लावत नाहीस म्हणून लातूर येथील मराठवाडा केसरीचे संपादक नरसिंह घोने यांच्यावर अज्ञात लोकांनी शुक्रवारी (ता.२६) मध्यरात्री हल्ला केल्याची घटना घडली असून त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र या घटनेचा हिंगोली येथे आंबेडकर प्रेस कौन्सिल संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष ऍड. रावण धाबे यांनी सांगितले.
लातूर येथील मराठवाडा केसरी वृत्तपत्राचे संपादक शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास बसस्थानक येथे आले असता काही तरुणांनी मद्यप्राशन करून तुम्ही आमची बातमी का लावत नाही असे म्हणून नरसिंह घोने यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला.यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता इतरांनी धावून येताच अज्ञात आरोपी फरार झाले. काही लोकांनी त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

रविवारी लातूर येथील शहर पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध संपादक नरसिंह घोने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकारावर किंवा संपादकावर हल्ले करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी लातूर येथील पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्री तथा जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. आता पोलीस व जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे पत्रकार संघटनेचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post