दारू पिवून धिंगाणा: पोलीस कर्मचारी निलंबित......

हिंगोली:- औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील बीट जमादार मिर हिदायत अली मिर महमूद अली या पोलिस कर्मचार्याला एकत्रितरीत्या मध्ये सेवन करून पिंपळदरी येथे धिंगाणा घातल्याबद्दल पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी निलंबित केले आहे.
याबाबत माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जि.प. सदस्य डॉ. सतीष पाचपुते, बाजार समितीचे संचालक संजय भुरके, तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव रीठ्ठे, यांच्यासह सर्व ग्रा.पं सदस्य, महिला व पिंपळदरीकर ग्रामस्थ यांनी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेवून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ३ फेब्रुवारी २०२१ रोजी केली होती.

त्यानंतर पोलीस अधीक्षक कलासागर यांनी पुढील प्रमाणे आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी निलंबन आदेश जारी केला आहे.


"कसुरी अहवाल क्र. ३६ दिनांक ०२/०२/२०२१

-: आदेश :-

ज्याअर्थी विनीर्दिष्ट केलेले पोलीस कर्मचारी यांनी कर्तव्यात बेशिस्त व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.

अनु क्र.१:- पोलीस अंमलदार यांचे नांव व हुद्दा पोह/४९७ मिर हिदायत अली मिर महेमुद अली. नेमणुकीचे ठिकाण:- पोस्टे कळमनुरी. आणि ज्याअर्थी, आपण पोलीस स्टेशन कळमनुरी अंतर्गत पिंपळदरी बिटचे बिट अंमलदार म्हणून नेमणुकीस आहात. तसेच दिनांक ३०/०१/२०२१ रोजी मौजे पिंपळदरी येथे भरविण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणा बंदोबस्तकामी, आपणास पो.स्टे.तील ईतर अंमलदार यांचेसोबत नेमण्यात आले होते. सदर ठिकाणी बिट अंमलदार या नात्याने, आपण शांततेत व सुव्यवस्थितपणे बंदोबस्त पूर्ण करणे अपेक्षित असताना, बंदोबस्ताचे ठिकाणी शासकीय गणवेषात हजर न राहता, साध्या वेषात हजर राहून, तसेच तेथील पाण्याचे टैंकरवर बसून, दारूचे सेवन करून, विनाकारण शिवीगाळ करीत असल्याचे व्हिडीओ चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारीत होवून व दिनांक ०२/०२/२०२१ रोजी दैनिक पूढारी या वर्तमानपत्रात सदर घटनेच्या अनुषंगाने वर नमुद बातमी प्रसिद्ध झालेली आहे म्हणून कसूर.

आणि ज्याअर्थी, आपण पोलीस हवालदार या अत्यंत जबाबदार पदावर बिट अंमलदार म्हणून कार्यरत असताना व आपणास आपल्या पदाची पूर्णपणे जाणीव असताना आपण, कुस्तीस्पर्धा बंदोबस्त या महत्त्वाच्या ठिकाणी आपणासोबत देण्यात आलेल्या पोलीस अंमलदार व होमगार्ड यांचेसह शांततेत व सुव्यवस्थितपणे बंदोबस्त पूर्ण करणे हे आपले आद्य कर्तव्य असून आपणास सोपविलेली जबाबदारी आपणास सर्वस्वी ज्ञात असतानासुध्दा, घटनेच्या ठिकाणी साध्या वेषात हजर राहून, आपणास दिलेले कर्तव्य पार न पाडता, मद्यपान करून व पाण्याच्या टैंकरवर बसून शिवीगाळ करून शिस्तप्रीय पोलीस दलास अत्यंत अशोभनिय असे कृत्य केलेले आहे. तसेच सदर घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारीत झाल्याने तुमच्या लांछनास्पद कृत्याने पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झालेली आहे म्हणून कसूर.

आणि ज्याअर्थी, आपण एक जबाबदार, कर्तव्यनिष्ठ पोलीस हवालदार दर्जाचे अंमलदार असुन, आपणाकडून सदर घटना घडणार नाही व बंदोबस्ताचे कार्य सुरळितपणे पार पाडणे अपेक्षित असताना, आपणच जाणून-बुजून सदर प्रकारचे गैरर्वतन केलेले आहे म्हणून कसूर.

त्याअर्थी मी एम.राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, हिंगोली महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २५ अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, सदरचे आदेश तामील झाल्याचे दिनांकापासून आपणास "शासकिय सेवेतून निलंबीत" करीत आहे.

तसेच विभागीय चौकशी नियम पुस्तीका सन १९९१ मधील नियम २.५ अन्वये खालीलप्रमाणे आदेश निर्मीत करीत आहोत."

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post