Crime: सहा महिन्याच्या बाळाला सोडून मातेचे पलायन.....

हिंगोली:- येथील राज्य परिवहन विभागाच्या बस आगारात ५ ते ६ महिन्याच्या मुलाला सोडून देऊन मातेने पलायन केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. सदर बाळाला हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले असून पोलिस संबंधित निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला आहे...
पोलिसांचा मेसेज

बस स्थानक हिंगोली येथे एक ५ ते ६ महिन्याचा बालक कोणीतरी सोडून गेलेला आहे. जर हा मुलगा कुणाच्या ओळखीचा असेल किंवा काही माहिती मिळाली तर पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे संपर्क करावा. पोलीस स्टेशन हिंगोली शहर फोन नंबर 8669900678.
बसस्थानका मधील चौकशी कक्षाच्या बाजूला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर सदर प्रकार सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. अज्ञात मातेने रात्रीच्या सुमारास या बाळाला बसस्थानकात सोडून पलायन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बाळाच्या आवाजान नागरिक त्याठिकाणी जमा झाले आणि त्यानंतर याबाबत हिंगोली शहर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सदर बाळाला शहर पोलीस ठाण्यात आणून त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे हलविली असून बाळाला सोडून जाणाऱ्या संबंधित निर्दयी मातेचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी यासंदर्भात बाळाचे छायाचित्र सुद्धा प्रसिद्ध केली असून सदर बाळ कोणाचे ओळखीचे असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क करून सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा पोलिसांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post