सिरपूरकरांनी करून दाखविलं; तालुक्यातून गाव बिनविरोध काढलं

पालम:- तालुक्यातून बिनविरोध ग्रामपंचायतीचे मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सिरपूर गावाने ग्रामपंचायत बिनविरोध काढत इतिहास रचला. ते ज्येष्ठांच्या मार्गदर्शन आणि पाच जणांनी उमेदवारीच बलिदान दिल्यामुळे होऊ शकलं. 
पालम तालुक्यात सुशिक्षितांचा गाव म्हणून सिरपूरची ओळख. त्याला साजेशी कामगिरी ग्रामस्थांना करता आली नव्हती. ही खंत मनात ठेवून प्रत्येक जण विकासाची आस लावून होता. म्हणून गावातील ज्येष्ठ मंडळी सर्व हेवेदावे, मतभेद, मनभेद विसरून एकत्र आली. त्यांनी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या तीन दिवसांपूर्वी गावात बिनविरोध ग्रामपंचायत काढली. त्या शब्दाला जागत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत अखेर सिरपूर ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. त्यासाठी प्रा. सुधाकर शेवटे, गोपीनाथ देशमुख, धनंजय गायकवाड, धोंडीबा कुरे, महेश लांडे यांनी उमेदवारीचं बलिदान देत गावाची इज्जत राखली. म्हणून गावात निवडणुका घेण्याची गरज राहिली नाही.

बिनविरोध सदस्यांत राहुल आवरगंड, पत्रकार भास्कर लांडे, सदाशिव लांडे, सुधाकर हनवते, बालाजी दुधाटे, विठ्ठल कदम, कृष्णा बचाटे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी हभप जयवंतराव लांडे, प्रा. सुधाकर शेवटे, शिक्षक भाऊसाहेब आवरगंड, बाबाराव आवरगंड, भाऊराव लांडे, सुभाष आवरगंड, अजय देशमुख, हभप तुकाराम महाराज लांडे, बाळू महाराज लांडे, रामराव दुधाटे, माधव कांबळे, दत्तराव आवरगंड, बालासाहेब बिडकर, मारुती आवरगंड, माणिकराव लांडे, बालाजी लांडे, रामचंद्र दुधाटे, नागनाथ कदम, माणिक कदम यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या