गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील "समता गौरव" पुरस्काराने सन्मानित

नांदेड:- गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांना सामाजिक,शैक्षणिक राजकिय व सहकार क्षेत्रातील योगदाना बदल डॉ.बी. आर फाउंडेशनच्या वतीने "समता गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ.बी. आर. फाउंडेशन च्या वतीने आयोजित समता गौरव पुरस्कार सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते राजश्री पाटील यांना देण्यात आला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष माजी खा.प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बी. आर. फाउंडेशन गेली १९ वर्षांपासून अविरतपणे पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक , राजकीय आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करत असते. गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील आजवरचे कार्य उल्लेखनीय आहे.सुप्रसिद्ध व्याख्यात्या म्हणून त्यांचा संबंध महाराष्ट्र भर नावलौकिक आहे.अनेक सामाजिक कार्यात त्या सदैव अग्रेसर आहेत.तर सहकार क्षेत्रात "गोदावरी अर्बन" चा राज्यातील नामांकित संस्थेत उल्लेख केला जातो. ४८०० महिला बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी ४८००० महिलांचे संघटन निर्माण केले असून त्यांना अर्थसाक्षर देखील केले आहे.या सर्व क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन समता गौरव पुरस्कार देण्यात आला.
यावेळी पुरस्काराला प्रतिउत्तर देतांना राजश्री पाटील म्हणाल्या की,पुरस्कारामुळे निश्चितच केलेल्या कामाचा सन्मान होत असतो व अधिकाधिक काम करण्याची उर्मी देखिल प्राप्त होत असते याचबरोबर जबाबदारी देखिल अधिक पटीने वाढत असते, याची जाणीव देखिल मला आहे भविष्यात देखिल मी माझ्या कार्याच्या कक्षा अधिक गतीने रुंदावत सर्वसामान्य व समाजातील शेवटच्या घटकांकरिता काम करीत राहणार हे मात्र निश्चित आहे.

यावेळी पत्रकारितेतील कृष्णाई पुरस्कार इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील उत्तम निवेदक, परखड व निर्भीड पत्रकार आशिष जाधव यांना दिला,सामजिक जाणिवेतून पत्रकारिता करणारे दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी संभाजी सोनकांबळे यांना तर प्रत्येक छायाचित्रामध्ये वेगळेपणा भाव असणारे छायाचित्रकार सचिन डोंगळीकर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी स्वागताध्यक्ष पत्रकार पंढरीनाथ बोकारे आयोजक बापूराव गजभारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने