Hingoli Crime: अन्नपूर्णा फायनान्स कंपनीच्या तिजोरीतून १५ लाख लांबविले

हिंगोली:- शहरातील हिलटॉप कॉलनीत असलेल्या अन्नपूर्णा फायनान्स कंपनीच्या तिजोरीतील १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडल्याने या संदर्भात पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावरून चौकशीचे काम सुरू होते. Safe Broken by thieves in Hingoli. Annapurna Finance office in Hilltop colony at Hingoli, 15 lakh rupees looted. Hingoli police have registered FIR against an unknown accused.
यासाठी फायनान्समधील १० कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. ओरिसा राज्यातील अन्नपूर्णा फायनान्स कंपनीच्या माध्यमातून बचत गटांना कर्ज पुरवठा केला जातो. हप्तेवारी नूसार या कर्जाची परतफेड प्रत्येक दिवशी रक्कम जमा करून केली जाते. 

सदर फायनान्स कंपनीतील तिजोरीतून १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडल्याने या संदर्भात रिजन्ल व्यवस्थापकांनी हिंगोली शहर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर , सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कंपनीच्या कार्यालयात येण्यासाठी असलेले प्रवेशव्दारे सुस्थितीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर रक्कम कर्मचाऱ्यांनीच लांबविल्याचा संशय बळावल्याने मंगळवारी दहा कर्मचाऱ्यांना शहर पोलिसांत बोलावून चौकशी सुरू केली . बुधवारी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांची चौकशी केली परंतू या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. Safe Broken by thieves in Hingoli. Annapurna Finance office in Hilltop colony at Hingoli, 15 lakh rupees looted. Hingoli police have registered FIR against an unknown accused. Hingoli Town Police are hunting the thieves in this connection.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने