Crime: ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्यावर हजर पोलीस कर्मचाऱ्यास जबर मारहाण; १७ आरोपीवर गुन्हा दाखल

वसमत:- तालुक्यातील गुंज येथील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यास बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याची घटना १५ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी १६ जानेवारी रोजी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच मुख्य आरोपीसह १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Assault on Police Personnel Posted On Election Duty. Police case against the 10-12 persons in Vasamat Tehsil.
याबाबत अधिक माहिती अशी की वसमत तालुक्यातील गुंज जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी गजानन मारोती पुरी हे ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान कर्तव्य बजावत होते. परंतु यावेळी शिवहार नरवाडे यांनी पुरी यांच्यासोबत वाद घातला. यावेळी पुरी यांनी मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर जाण्याचे सांगून देखील शिवहार नरवाडे गेले नाहीत. मतदान बूथ ताब्यात घेण्याचा कट रचून पोलीस कर्मचारी पुरी यांच्यासोबत शिवहार नरवाडेने हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा केला. तर इतर आरोपींनी पुरी यांना लाथा-बुक्क्यांनी व दगडाने जबर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Assault on Police Personnel Posted On Election Duty. Police case against the 10-12 persons in Vasamat Tehsil. Election department had appointed Gajanan Maroti Puri on election duty in Vasmat tehsil at Gunj village.

याप्रकरणी गजानन पुरी यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिवहार नरवाडे, दत्ता नरवाडे, विश्वनाथ नरवाडे, काशिनाथ नरवाडे, मन्मथ नरवाडे व इतर दहा ते बारा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा करून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. चवळी हे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या