Murder: हिंगोली शहरात नवविवाहितेचा गळा आवळून खून; पतीसह दोघांवर गुन्हा

हिंगोली:- शहरातील तिरुपती नगरात २१ वर्षीय नवविवाहित महिलेचा पती आणि दीर यांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. शवविच्छेदन हवालात मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर तब्बल ५ दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. Newly married woman strangled to death by husband and brother-in-law in Hingoli City.
किरण पंकज सावंत असे खून झालेल्या महिलेचे नाव असून पती पंकज बाबाराव सावंत (२८) आणि दीर गोपाल बाबाराव सावंत (२३) अशी आरोपींची नावे आहेत. मूळ पूर (तालुका:- औंढा नागनाथ) येथील रहिवासी असलेले आरोपी हिंगोली शहरातील तिरुपती नगरात वास्तव्यास आहेत. दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी रात्री ८.३० ते ९.४५ वाजण्याच्या सुमारास मयत महिलेचा पती पंकज आणि त्याचा लहान भाऊ गोपाल यांनी महिलेचा अज्ञात कारणावरून गळा आवळून खून केला. ही घटना १८ जानेवारी रोजी घडल्यानंतर मृत्यू पावलेल्या महिलेचे सरकारी रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर २३ जानेवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Newly married woman strangled to death by husband and brother-in-law in Hingoli City. Kiran Pankaj Sawant is the deseased while Pankaj Babarao Sawant and Gopal Babarao Sawant are the accused in this crime. विशेष म्हणजे याबाबत खून झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी फिर्याद दिलेली नसून स्वतः सरकार पक्षातर्फे हिंगोली शहर ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांनी दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असून खुनाचे कारण काय आणि या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहेत काय? याबाबतचा तपास करून आरोपींना गजाआड करण्यात येणार आहे.

या घटनेमुळे हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे. The Hingoli City police PI Sardarsing Thakur has suo motu taken cognizance of the incident and logged FIR in the case.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या