खळबळजनक POLITICS : निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मां यांनी मांडली सत्यस्थिती....... 

हैदराबाद : ‘महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं आहे. असं असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाते,’ असं खळबळजनक विधान राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा केलं. त्या हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या राजकारणातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. (National womens commissions president on women’s representation in politics). रेखा शर्मा यानी केलेले हे विधान खळबळजनक वाटत असले तरी नेहमीच समोर येणार्‍या घटनामुळे त्यात वस्तूस्थिती सुद्धा असल्याचे दिसून येते.  No Ticket To Women Without Relationship With The Men In Politics, Says Rekha Sharma, President, National Women's Commission. 

यावेळी बोलताना रेखा शर्मा यांनी महिलांच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. त्यांनी सरकारमधील महत्त्वाच्या खात्यावर अनेक महिला असल्याचे सांगितले. मात्र ही संख्या अतिशय कमी असल्याचे म्हणत ही बाब चिंता वाढवणारी असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  No Ticket To Women Without Relationship With The Men In Politics, Says Rekha Sharma, President, National Women's Commission. She also raised concern over the deterioting condition of the degrading politics in India.

यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीत महिलांना डावललं जाण्यावरुन चिंता व्यक्त केली आहे. कोणाताही राजकीय पक्ष महिला नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यासाठी उत्सूक नसतो असं त्यांनी म्हटलंय. तसेच महिला निवडणूक जिंकू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित करत महिलांना डावललं जातं,” असं म्हणत त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, “ज्या व्यक्तीची प्रतीमा मलीन झालेली असते. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात, अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जाते,” असं निरीक्षण त्यांनी नोंदवत त्यांनी भारतातील राजकीय पक्षांवर टीका केली आहे.  (National womens commissions president Rekha Sharma comments on women’s representation in politics).


The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने