Shakti Act: शक्ती फौजदारी कायदा अधिक प्रभावी होण्यासंदर्भात नागरिकांनी सुधारणा, सूचना पाठविण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

मुंबई:- माता-भगिनी बालकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी, याकरिता ‘शक्ती’ हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरिता नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात, असे आवाहन समिती प्रमुख तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. (Maharashtra government appeals to citizens of state to give positive responses and views, recomendations on new shakti act)
हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आलेले आहे. या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री अनिल देशमुख आहेत. या विषयामध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती, महिलांच्या संघटना, विधिज्ञ, स्वयंसेवी संस्था आपल्या सूचना अथवा अन्य काही सुधारणा सुचवू शकतात. (Maharashtra government appeals to citizens of state to give positive responses and views, recomendations on new shakti act)

या विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रती शासकीय ग्रंथागार नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या विधेयकाची प्रत www.mls.org.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. संबंधितांनी आपल्या सूचना सुधारणा निवेदनाच्या स्वरूपात तीन प्रतीमध्ये विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळ, बॅकबे रेक्लेमेशन मुंबई येथे किंवा a1.assem-bly.mls@gmail.com या ईमेलवर 15 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने