"एक पहेचान- लेखक" समुहाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कवि संमेलन

हिंगोली/डीएम न्यूज:- शहरातील अकोला बायपास येथे शिवनेरी चौकात एका हॉल मध्ये एक पहेचान लेखक समुहाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथमता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका सौ. सिंधुताई दहिफळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य सुधाकर इंगोले, मुख्याध्यापक माधव जाधव यांची उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील सुनिता ताई घोडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बहरदार कविता सादर केली.तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे सौ. सिंधुताई दहिफळे यांनी सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक माधव जाधव यांनी हि असे सांगितले की तरुण पिढीतील मुला मुलींना जास्तीत जास्त वाचणाची सवय लावली पाहिजे. यावेळी उपप्राचार्य सुधाकर इंगोले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी अनेक कविंनी अनेक बहारदार कविता सादर केल्या. सौ. सिंधुताई दहिफळे, सुधाकर इंगोले, विजय गुंडेकर, असिफ, मुस्तफा, संपत मुरकुटे, सुमेध मुजमूळे, मिलिंद खिल्लारे, रोहीणी धुळे, वैधवी, धर्माधिकारी, माधव जाधव, यांनी अनेक कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा वानखेडे, महेश राखोंडे, मयुर देवहंस, यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा वानखेडे यांनी केले. तर आभार महेश राखोंडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या