हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात दीड हजार महिलांचा सहभाग

हिंगोली - शहरातील एनटीसी भागातील सिद्धिविनायक सोसायटी च्या वतीने छत्रपती राजे शिवाजी उद्यानात शनिवारी( ता.२३)घेण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या दीड हजार महिलांनी सहभाग घेतला होता.
येथील छत्रपती राजे शिवाजी उद्यानात शनिवारी मकर संक्रांती सणाचे अवचित्य साधून मागील वर्षा प्रमाणे यंदाही सिद्धिविनायक सोसायटीतील महिलांच्या पुढाकारातून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्यानात आकर्षक रांगोळ्या काढून सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. त्यानुसार प्रारंभी तुळजा भवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सायंकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावीत उखाणे घेण्यात आले. हा कार्यक्रम जवळपास तीन तास चालला होता.यावेळी नाईकनगर ,शिवाजी नगर , मंगळवारा, नगर परिषद कॉलनी आदिसह शहरातील दीड हजार महिला सहभागी झाल्या होत्या. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी कुटुंबासह स्नेहभोजनाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमासाठी सिद्धिविनायक सोसायटीतील सौ. योगिता देशमुख, सौ. कमला यादव, सौ. अक्षरा माद्रप, सौ, कुंता लोखंडे, सौ, वंदना धूत, सौ. सुनीता बत्तलवाडीकर ,सौ. अरुणा ठाकरे, सौ. मीरा कोरडे, सौ. अनिता शिंदे, सौ. सुरेखा लोखंडे, सौ सुवर्णा गायकवाड, सौ. सुप्रिया हिरास, सौ. प्रज्ञा पैठणकर, सौ. प्रतिभा पारेकर ,सौ शीतल कोरडे, सौ. सरोज मुसळे, सौ. जगजीतकौर अलग आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या