Inspection: उपायुक्त वेदमूथा यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

हिंगोली/बिभीषण जोशी:- विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त वेदमूथा शुक्रवारी हिंगोली येथे आले असता जिल्हा परिषदेच्या विविध विभागाची पाहणी करून अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. Vedmutha, Deputy Commissioner of Aurangabad division inspects records of Hingoli zilla parishad, appreciated the works of the officials.
दरम्यान, जिल्हा परिषदेत सुंदर माझे कार्यालय व वसुंधरा क्रांती अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या विविध विभागात स्वछता आहे किंवा नाही याची चाचपणी करण्याकरिता उपायुक्त वेदमूथा आले होते. यावेळी त्यांनी अर्थ विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पाणी व स्वछता मिशन कक्ष, आरोग्य विभाग आदींची पाहणी केली, असता यावेळी त्यांनी समाधान व्यक्त करून अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. विशेष म्हणजे त्यांनी सामान्य प्रशासन विभागातील अभिलेख्याची पाहणी केली असता समाधान व्यक्त केले तर अर्थ विभागात जाऊन त्यांनी पाहणी केली असता यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अर्थविभाग हा सगळ्यात स्वछ व सुंदर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. Vedmutha, Deputy Commissioner of Aurangabad division inspects records of Hingoli zilla parishad, appreciated the works of the officials.

दरम्यान, त्यानंतर त्यांनी सर्व विभागीय अधिकारी, यांची कार्यशाळा घेतली, यामध्ये त्यांनी सांगितले की, कार्यालयातील फर्निचर ,फेकून न देता त्याची दुरुस्ती करून पुन्हा उपयोगात आणणे, कचऱ्या पासून खत निर्मिती करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वीज बिल कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने सोलर ऊर्जा बसविणे, तसेच प्रत्येक कार्यालयातील अंतर्गत व बहिर्गत स्वछता राखणे, विभागातील टीम तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी इगो बाजूला सारून हासत खेळत कामे केल्यास कार्यालय स्वछ व सुंदर दिसेल असे त्यांनी सांगितले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने