Reservation हिंगोली: मतदारसंख्या असूनही अनुसूचित जातीला सरपंच पदाचे आरक्षणच नाही

हिंगोली:- हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची मतदार संख्या मोठ्या प्रमाणावर असताना सुद्धा या गावांमध्ये गेल्या 50 वर्षांपासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण सुटले नसल्याने या वर्गाला राजकीय आरक्षण मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरक्षण सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गावर होत असलेल्या अन्यायाबाबत यापूर्वी आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अनुसूचित जातीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडण्याची मागणी केली होती. Demand to give reservation to scheduled castes in gram Panchayat Sarpanch election in Hingoli district.
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या अनागोंदी कारभारामुळे अनुसूचित जातीच्या अन्याय होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. परंतु जिल्हा स्तरावर या निवेदनांची दखल घेतली जात नसल्याने अनुसूचित जातीच्या उमेदवारांना सरपंचपद मिळत नाही. निवडणूक विभाग आणि प्रशासनाचे असेच धोरण राहिल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांनी दिला आहे.
आता राज्यस्तरावरून सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर आता पुन्हा सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमधील नागरिकांनी आज याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सरपंच पदाच्या या नवीन सोडतीमध्ये ज्या गावांना गेल्या सुमारे ५० वर्षात आरक्षण मिळाले नाही, अशा गावांना सरपंच पदाचे आरक्षण सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आज हिंगोली तालुक्यातील बेलुरा, औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळुंके, कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ या गावांमधील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी सोडण्याची मागणी केली आहे. असाच प्रश्न हिंगोली जिल्ह्यात सुमारे ५० गावांमध्ये निर्माण झाला असून या गावांमध्ये अनुसूचित जातीची संख्या असूनही काही ठिकाणी प्रभागांमध्ये आरक्षण सुटले नाही, तर अनेक गावात सरपंच पदासाठी सुद्धा आरक्षण सुटले नाही. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. No political reservation to scheduled castes in many villages, Gram Panchayat in Hingoli district. Memorandum handed over to Hingoli district collector in this regard by Republican Sena Party and Ambedkarite Party of India.

यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रावण धाबे, उपाध्यक्ष ॲड. मारुती सोनुले, राजेश नरवाडे, संगीता नरवाडे, पार्वतीबाई कुबडे, श्रीराम पाईकराव, सुरेश नरवाडे, महेंद्र घोंगडे, किशोर घोंगडे, विनोद घोंगडे, सुनील बलखंडे, रामप्रसाद घोंगडे, संदीप घोंगडे, बन्सी खडसे, शोभाबाई खडसे, सुधाकर शिरसाठ, विनोद खडसे, भिमराव खडसे, अविनाश खडसे, सविता खडसे, वैशाली खडसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या