Corona मोठी बातमी:- हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण....

हिंगोली/डीएम न्यूज:- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाची पहिली लस प्रियंका साहेबराव राठोड या आरोग्य कर्मचाऱ्यास देण्यात आली. या बरोबरच हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. Covid-19 Vaccination Started in Hingoli District. First dose was given to health worker from Hingoli civil hospital.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोपाल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थिती लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. आरोग्य कर्मचारी प्रियंका साहेबराव राठोड यांना पहिला डोस देण्यात आला आहे. आरोग्यसेविका गंगा कळासरे यांनी हा डोस दिला आहे. 
न्यूज अपडेट:- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने दुपारी ४ वाजता असे स्पष्टीकरण करण्यात आले की, हे लसीकरण नसून केवळ लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली आहे. परंतू काही दिवसातच लस उपलब्ध झाल्यावर असेच लसीकरण करण्यात येणार आहे.

सामान्य रुग्णालयाच्या वतीने अगोदर देण्यात आलेल्या माहितीनुसार, लसीकरण करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. वाचकांनी याची नोंद घेण्यात यावी.

__ संपादक. 

हिंगोली जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यामुळे नागरिकांसाठी मोठी खूषखबर मिळाली आहे. असे असले तरी नागरिकांनी लॉकडाऊन आणि कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. Covid-19 Vaccination Started in Hingoli District. First dose was given to health worker from Hingoli civil hospital. The vaccination was begun in presence of the Hingoli District magistrate Ruchesh Jaivanshi and Health officers today.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या