Dhananjay Munde-Renu Sharma Case : रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे मागणी, BJP demand action against Renu Sharma for fake complaint...

मुंबई:- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार केल्यानंतर ती पुन्हा परत घेतलेल्या रेणू शर्मा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, धनंजय मुंडे यांच्यावर खोटा आरोप केल्या प्रकरणी रेणू शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन चित्रा वाघ यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रसाद लाड यांनीही अशा प्रवृत्तींना वेळीच आळा बसला पाहिजे. त्यासाठी रेणू शर्मा यांच्यावर कारवाई व्हावी, असं म्हटलं आहे.(Chitra Wagh’s demand to file a case against Renu Sharma who has made complaint of rape against Dhananjay Munde and later withdrew the complaint)




चित्रा वाघ यांनी याबाबत सांगितले की, हे प्रकरण धनंजय मुंडे किंवा रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नाही. या प्रकरणात योग्य कारवाई झाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकीबाळींना भोगावे लागतील. त्यासाठी रेणू शर्मा हिच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी नांगरे-पाटील (IPS Vishwas Nagar Patil) यांची भेट घेऊन केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, असे म्हणत रेणू शर्मा यांच्यावर कारवाई करावी, असं चित्रा वाघ म्हणाल्या. Withdrawn of complaint would give bad message in society and in future the real victims will never get justice from society, Chitra Wagh said. मंत्री मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. विरोधीपक्ष भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तर आता रेणू शर्मा या महिलेने हा आमचा कौटुंबिक वाद असल्याचं सांगित तक्रार मागे घेतली आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारासारखा गंभीर आरोप करून तो पुन्हा मागे घेणे हा काही खेळ नाही. अशा घटनांमुळे राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.




काय आहे प्रकरण, What's the case?




रेणू शर्मा ही धनंजय मुंडे यांची दुसरी बायको करुणा शर्मा- मुंडे हीची लहान बहीण आहे. माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर

पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या आमिषाने, बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक-निर्मांत्याशी भेट घडवण्याच्या आमिषाने धनंजय मुंडे यांनी इच्छेविरुद्ध आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले असे आरोप तिने केले होते. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. शरद पवार यांनीही या प्रकरणाची दखल घेत, पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं म्हटलं होतं. भाजपनंही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीपासून ते आमदारकी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. तर उलट मुंडे यांना फायदा होईल यासाठी भाजपचे कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी (Krishna Hegade and Manish Dhuri had made complaints of honey trap against Renu Sharma) यांनी रेणू शर्माविरोधात पोलिसांना एक पत्र लिहिलं आणि या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. चार पाच दिवस प्रकरण चांगलेच तापल्यावर अचानकपणे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली. त्यामुळे आता रेणू शर्मा यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी होत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने