Crime: ५ हजाराची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

हिंगोली/बिभीषण जोशी:- सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाच्या फरकाच्या बिलाची छाननी करून शिक्षण अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन औरंगाबाद येथील उपसंचालक यांच्याकडे दाखल करण्यासाठी तक्रादाराकडून मंगळवारी (ता.१९) पाच हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले . Assistant Accountant caught red handed while accepting bribe of Rs. 5000, by anti-corruption bureau, Hingoli.
येथील सहाय्यक लेखाधिकारी भगवंत प्रशांत कपाळे भविष्य निर्वाह निधी पथक राहणार आनंदनगर यांनी वसमत येथील तक्रारदाराला सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाच्या फारकाच्या बिलाची छाननी करून शिक्षण अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन उपसंचालक यांच्याकडे दाखल करतो म्हणून पाच हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यानुसार तक्रारदार याने नेहमीच हा अधिकारी पैसे दे नाहीतर तुझे काम होणार नसल्याचे सांगत होता. अखेर तक्रारदाराने दोन दिवसांपूर्वी सहायक लेखाधिकारी भगवंत कपाळे यांनी पाच हजार लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस उपधीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने या प्रकाराची सत्यता पडताळणी केली असता यात पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे स्पस्ट झाले. Assistant Accountant caught red handed while accepting bribe of Rs. 5000, by anti-corruption bureau, Hingoli.

त्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानाजवळ असलेल्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयात पावणे दोनच्या सुमारास सापळा रचला होता. त्यानंतर सहाय्यक लेखाधिकारी यांनी काम करून देण्यासाठी तक्रादाराकडून पाच हजार लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने ताब्यात घेतले वलाच लुचपत कार्यालयात आणले, त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. Assistant Accountant caught red handed while accepting bribe of Rs. 5000, by anti-corruption bureau, Hingoli.

ही कामगिरी पोलीस अधिक्षिका श्रीमती कल्पना बारवकर ,अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपधीक्षक नितीन देशमुख,पोलीस निरीक्षक ममता अफूने, सपोउपनी बुरकुले,विजयकुमार उपरे, संतोष दुमाणे, महारुद्र कवाडे ज्ञानेश्वर पंचलिंगे ,विनोद देशमुख, अविनाश कीर्तनकार ,प्रमोद थोरात यांच्या पथकाने कारवाई करून लाचखोर अधिकाऱ्यास ताब्यात घेतले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने