अवैध सावकारी करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार जोशी यांचे अन्नत्याग

प्रशासकीय यंत्रणेकडून मात्र टोलवाटोलवी....

नांदेड, दि. ६:- अवैध सावकारी व्यवसाय करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करावेत, या मागणीसाठी ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांनी अन्न त्याग सत्याग्रह सुरु केला आहे. याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व सहकार विभागाकडे तक्रार नोंदविली आहे. जोशी यांनी दि. २ डिसेंबरपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरु केला आहे. त्यांच्या सत्याग्रहाचा ५ वा दिवस आहे.

जोशी हे पत्रकार व्यवसायात चाळीस वर्षापासून काम करतात. त्यांच्या मुलाला व कुटुंबानी शहरात अवैध सावकारी व्यवसाय करणार्‍याकडून दहा ते पंधरा टक्क्यांनी कर्ज घेतले. त्या पैश्याच्या मोबदल्यात त्यांनी कुटुंबाकडून कोरे चेक व बाँडपेपर घेतले. व्याजाची रक्कम थकत गेल्यानंतर या लोकांनी घरी गुंड पाठवून धमकी व त्रास देण्यास सुरूवात केली. या सावकारांनी व्याजापोटी चाळीस ते पन्नास लाखाला लुटले आहे. तरी त्यांचा व्याजाचा तगादा चालू आहे. पत्रकार जोशी यांना याची कल्पना नव्हती, त्यांना अवैध सावकारी व्यवसायात आपले कुटुंब फसल्याचे कळाले, तेंव्हा त्यांनी २२ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मगर यांची भेट घेवून तक्रार दिली. मगर यांनी हे प्रकरण नांदेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल फिस्के यांच्याकडे सोपविले. प्रारंभी फिस्के या सावकरांना बेड्या घालू अशी भाषा वापरली. नंतर मात्र या प्रकरणात तडजोड करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांनी अवैध सावकारी करणार्‍यांना एकत्रितपणे बोलविले!चर्चा केली. त्यानंतर संनमताने त्यांचे एकसारखे जवाब नोंदवून घेतले. ते चौकशीसाठी मला व कुटुंबाला रोज सकाळी कार्यालयात बोलावयाचे तेथे दिवसभर बसवून ठेवायचे.

काय म्हणतात पत्रकार जोशी.... 

सावकारी लांडगे,नेते आणि शासकीय यंत्रणा?

अवैध सावकारी करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करावा,या मागणीसाठी मी अन्नत्याग सत्याग्रह केला. मी मधुमेहाचा व र्‍हदय विकाराने आजारी असताना चार दिवस तोंडात अन्नाचा एक घास टाकला नाही. यामुळे अशक्तपणा आला आहे.याची मला चिंता नाही.मी अन्नत्याग केल्यानंतर अनेकांनी मला मोबाईलवर संपर्क साधला.काळजी घेण्याचा सल्ला दिला.मित्र परिवार भेटण्यासाठी घरी आला होता. आपण कशाला क्लेश कशाला करून घेता?हा सत्याग्रह सोडा, असे प्रेमाने सांगितले गेले.त्यांच्या मनात माझ्याविषयी आपुलकी आहे,म्हणून हे मत व्यक्त केले आहे.बहा सत्याग्रह करण्यामागे कारण अश्या सावकारी लांडग्यापासून लोकांनी सावध तरी रहावे, त्यांचे तरी घरे उध्वस्त होवू नये,हेच आहे. राज्यात सावकारी व्यवसाय करोनाप्रमाणे पसरत चालला आहे.गावातील सभ्य म्हणणारी माणसे दहा- ते पंधरा टक्के व्याजाने अवैध सावकारी व्यवसाय करत आहेत, या अवैध व्यवसायाने अनेकांची बळी घेतलेला आहे,अनेकांनी व्याजापायी आपली घरे, शेती गमावली आहे. हे खुलेआम चालत आहे. पण शासकीय दफ्तरी या कारणाची नोंद कोठेही होत नाही. गावातील प्रतिष्ठीत, सभ्य माणूस हा व्यवसाय करत असल्याने त्याच्या विरोधात कोणी जाणार नाही.गावात कोण धंदे करतो, याची राजकीय नेत्यांना माहिती असते. पण या प्रकरणात आंधळे व बहिरे होताता. या लांडग्याना त्यांचा आशीर्वादच मिळत असतो.यांच्या विरोधात तक्रार की, त्यांना वाचविण्यासाठी नेतेच पुढे येतात.अश्या प्रवृत्तीचे व्यक्ती राजकीय नेत्यांशी जवळीक साधतात. निवडणुक काळात, नेत्यांच्या पुढे -पुढे करणे!, सतत भेट राहणे, पाया पडतात, स्वत: चार पैसेही लावत असतात. कारण संकट आलेच तर आमदारच आपल्याला वाचवतील याच अपेक्षेने चापुलशी करत असतात.मग राजकीय दुर्लक्ष करतात.त्यामुळे हा आमदाराचा खास माणूस गावभर फिरतो, लोकांना लुटतो.अश्या प्रवृत्तीची माणसे अनेकांचे संसार उध्वस्त करतात याची त्यांना खंतही वाटत नाही.राजकारण हे समाजसेवा राहिलेली नाही!तो धंदा बनला आहे, यात चारित्र्यवान नेते बोटावर मोजण्याइतके सापडतील वेश्या तरी बर्‍या म्हणायच्या! त्या ग्राहकाशी किमान प्राणाणिक वागतात. दोन दिवसापूर्वी मी एका आमदाराला अवैध सावकारी व्यवसायाच्या विरोधात मंत्र्याना पत्र द्यावे,असे सांगितले,तेंव्हा त्यांनी आमचे माणसे अडकतील,असे म्हणत त्यांनी पत्र देण्याचे नाकारले. सावकारी व्यवसाय अनादी काळापासून चालत आलेला आहे.ही समाजातील घातक प्रवृती आहे. स्वातंत्र्यानंतर सावकारी कायदा १९४६ मध्ये आणला गेला,तरी सावकारी व्यवसाय चालत होता.त्यानंतर २०१४ नवीन सावकारी कायदा आणला गेला. तरी हा व्यवसाय थांबलेला नाही. या कायद्याने थोडा लगाम बसला. पण कायदा आला की,पळवाट आलीच.आता या व्यवसायासाठी कोरे चेक, स्टँप पेपरचा वापरमोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्याव्दारे कर्जदाराला ब्लॅकमेल व भीती दाखवून व्याज वसूली केला जात आहे. एखाद्या तक्रार झाली लांडगे उदारवादी व मदतगाराची भूमिका बजावतात. 'त्यांना आर्थिक असल्याने 'उसने पैसे दिले'असा बचाव करतात. माणूस विश्वासू व्यक्तीलाच उसने व मदत म्हणूनपैसे देतो! अनोळखी व्यक्तीला देत नाही. त्यासाठी ते चेक व बाँड पेपर मागत नाहीत. हे सहकार व पोलीस यंत्रणेला माहित नाही काय? यांच्या कानात उकळते तेल टाकले पाहिजे.अशी तक्रार जर पोलीसात गेली तडजोडी त्यांचे खिसे भरण्याचे काम केले होते. पोलीस तक्राराची प्रतीक्षा करत असतात.'तुमची चूक आहे! पैसे कशाला घेतले?असे म्हणून त्याचेच खच्चीकरण करतात, "गरजवंताला अक्कल नसते' हे त्यांना ज्ञात नसावे.माणूस अभिमन्यू प्रमाणे व्याजाच्या चक्रव्युहात सापडला की!तो बाहेर निघून शकत नाही. तो मेला तरच सुटला!त्यात शासनच सावकारी व्यवसायाचे परवाने देत आहेत, नांदेडातब२८८ वर परवानधारच सावकार आहेत! फायनान्सवाल्यांनी दुकाने उघडली जात आहे.ही मंडळी परवान्याच्याआड दहा ते पंधरा टक्के व्याजाने कर्ज देतात. याचे खायचे दात वेगळे दाखवयाचे दात वेगळे असतात.त्यांचे संरक्षण सहकार विभाग करते. अश्या परवान्याची गरज तरी काय? एकीकडे दारू हे विष आहे, म्हणायचे असते, दुसरीकडे सरकारच माणसे मारण्यासाठी शासकीय अधिकृत दारू दुकानाला परवानगी द्यावयाची. स्वातंत्र्यानंतर गावो- गाव वाचनालय सुरु करण्याएवजी सरकारने दारूचे दुकाने उघडली.हाच का? गांधीजींचा विचार होता का? दारूमुळे अनेक गावे व्यवसानाधीन बनली आहेत. या गावात कोणी सोयरीक करावयास तयार नाहीत. माझ्या चिखली गावचे उदाहरण देत आहे. गावात दारुड्याचे प्रमाण वाढले आहे, दारूडे हैदोस घालतात!दारूसाठी भीक मागतात, लोकांना भांडतात, त्रास देतात, गावात रात्रीच्यावेळी पोलीस जमादार! शिपायी येण्यास भितात.वआपल्या गावाबद्दल लिहिताना वाईट वाटते. याला जबाबदार कोण? भाग्यनगर भागात मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाने व्याजाच्या छळामुळे आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूपत्रात चिठ्ठीत नावे लिहिलेली असताना पोलिसांनी कोणाला अटक केलेली नाही.त्यात नांदेड शहरातील कोट्यधीश माणसाचे नाव आहे!तो त्याचा व्याजाचा मोठा व्यवसाय आहे. हे जगजाहीर आहे. मी फेब्रुवारी महिन्यात अवैध सावकाराच्या विरोध तक्रार दिली.प्राथमिकदृष्या ते अवैध सावकारी व्यवसाय करत हे दिसत असतानाही पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ केली. पोलीस अधिकार्‍यांनी चौकशीच्या नावाखाली प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न केला.त्या सावकारांनाविषयी सहानूभूती दाखविली. त्यांनी बाहेर आपसात मिटून घ्या! असा सल्ला दिला.मी व्याज देणार नाही! हेच स्पष्टपणे सांगितले.बएका पोलीस अधिकार्‍याने मला दोन टक्के द्या हे प्रकरण मिटवितो! असे म्हणाला.पोलीस इतके निर्ढावलले आहेत.त्यांना भीती वाटत नाही. चौकशी करणार्‍या पोलीस अधिकार्‍याने तर या लांडग्यांना एकत्रित बोलावून संघटीत केले! त्यांना सल्ला दिला!कान भरले. नंतर हे प्रकरणअंगलट येते असे दिसताच त्यांनी हे प्रकरण अभिप्रायासाठी सहकार विभागाकडे पाठविले. सहकार विभागाने यात दिरंगाई, झडतीचा देखावा निर्माण केला, कतर्फी व सारखे जवाब घेतले. या सावकारीला वाचविण्याचे कागदोपत्री कारस्थान रचले, हे प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न होत आहे.हे जरी माझे वैयक्तीक प्रकरण असले तरी माणूस म्हणून तो अन्याय नाही का? नांदेडचे पत्रकार मदतीला आले नाहीत. त्यांनी यंत्रणेवर दवाब आणला असता तर गुन्हे दाखल झाले असते. माझी भूमिका नांदेड पत्रकारांना पटत नसेलही, पण माझा कोणाला बद्दल वैयक्तीक आकस नाही,बअथवा स्पर्धाही नाही. कुत्र्याची जात एकमेकाची वैरी असते.बतसे आम्हापत्रकारांचे आहे. ही खेकड्याची जात आहे. मी अडचणीत सापडलो असताना खा.प्रताप पाटील चिखलीकर प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे! श्रमिक एकजूटचे संपादक कृष्णा शेवडीकर, सामनाचे प्रतिनिधी विजय जोशी, मराठवाडा नेताचे संपादक बद्दर! हिंगोलीचे पत्रकार बांगर, प्रल्हाद उमाटे, पंढरीनाथ बोकारे, मित्र लक्ष्मण संगेवार, राजू किवळेकर, अॅड. जोंधळे यांनी धैर्य दिले! सहकार्य केले! त्यांचा मी ऋणी आहे. मला आर्थिक मदत नको साथ हवी आहे, तीही चांगल्या कामासाठी. मुबंईचे पत्रकार मदतीला आले,ते सहकार मंत्र्याला भेटणार आहेत,त्यामुळे मी तूर्त अन्न त्याग सत्याग्रह स्थगित केला आहे. भाग्यनगर पोलिसात याचा अर्ज देण्यास गेले असताना त्यांनी स्वीकारला नाही. वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढताना अनेक संकटाला तोंड द्यावे लागते! अडथळे आणले जातात! दबाब आणला जातो !अपमानही सहन करावा लागतो. तेंव्हाच तो लढा यशस्वी होतो. माझी सावकारी लांडग्याच्या विरोधात लढाई चालूच राहणार आहे. त्यांचा बुरखा फाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आज अवैध सावकारी व्यवसायाच्या विरोधात संघटना उभाण्याची खरी गरज आहे. त्यात वकील,शासकीय अधिकारी!समाज सेवक, पत्रकारांनी पुढाकार घ्यावा.या संघटनाच्या माध्यमातून अश्या संकटात सापडलेल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढे यावे, हीच अपेक्षा.

___ कमलाकर जोशी, ज्येष्ठ पत्रकार नांदेड.
सायंकाळी मग ''साहेब येणार नाहीत"! असे सांगून परत पाठवयाचे! असे बरेच दिवस चालले. यात दीड महिना गेला. अचानकपणे पत्रकाराच्या व्हाटसअॅपवर हा व्यवहार खासगीतला आहे! असा संदेश पाठविला. मी ही माहिती पोलीस प्रमुख मगर यांना दाखविली. त्यांनी हे प्रकरणे दुसर्‍या अधिकार्‍याकडे देण्याचे सांगितले! पण त्यांनी जिल्हा उपनिबंधकाशी बोलावून घेतले. त्यानंतर हे प्रकरण अवैध सावकारी कायद्याच्या भंग करणारे असल्याने त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकार्‍यांनी सावकारकडील कोरे चेक व स्टँप हस्तगत करण्याचे सांगतिले. पण त्यांनी ते हस्तगत केलेच नाही. उलट त्या सावकारांना फूस लावली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी १२ ऑगस्ट रोजी लेखी तक्रार, शपथपत्र घेतले गेले. यात त्यांची नावे, पत्ते, घेतले. व्याजाची रक्कम आदी सविस्तर माहिती दिली गेली. सहकार विभागाने प्राथमिक दृष्ट्या हा अवैध सावकारी व्यवसायाचा प्रकार असल्याचे सांगितले. त्यांच्यावर कारवाई करण्याचा विश्वासही दिला. पण नंतर सहकार अधिकार्‍याने टाळटाळ सुरु केली. आता सण असल्याने पोलीसांची मदत मिळत नाही. मी रजेवर आहे. सद्या पीक विम्याचे काम लागले आहे. असे कारण सांगत गेले. नंतर बोभाटा झाल्यानंतर काही ठिकाणी झडतीचे देखावा केला. तर इतराची झडती घेतली गेलीनाही. उलट आमच्या विरोधात सावकाराशी संनमतकरून एकसारखे व एकतर्फी जवाब नोंदवून घेतले. हे प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न करत आहेत नवीन कायद्यानुसार सहकार अधिकार्‍याला दिवाणी न्यायधिशाचे अधिकार आहेत.त्यांना झडती घेणे, कागदपत्रे हस्तगत करणे, चौकशी करणे, उलट तपासणी करणे, नोटीसा बजावून प्रकरण उजेडात आणणे त्यांचे कर्तव्य आहे. पण त्यांनी यात जाणीवपूर्वक दिरंगाई टाळटाळ केली आहे. अश्या प्रकरणात गुप्तता पाळली जाते,पण त्यांनीच सावकारांना सावध केले.त्या लोकांना वाचविण्याच्या उद्देशाने जबाब,देखावा केला. काही जणाकडे चेक सापडून कारवाई केली नाही. पोलीस व सहकार विभागाने अवैध सावकारी कायद्यान्वये कारवाई करण्यासटाळटाळ केली. 

यापूर्वी जोशी यांनी अन्नत्याग सत्याग्रह केला होता. पण पोलीस अधीक्षक मगर, खा. चिखलीकर यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने त्यांनी सत्याग्रह मागे घेतला होता. त्यांनी "मरेन पण व्याज देणार नाही" अशी प्रतिज्ञा केली आहे. सहकार विभागाने आजपर्यंत कारवाई केली नसल्याने त्यांनी पुन्हा दि. २ डिसेंबर पासून करोनाच्या संकटामुळे घरीच "अन्न त्याग" सत्याग्रह सुरु केला आहे.आजही सावकारांकडून धमक्या व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत! त्यामुळे त्यांनी घर व शेत विक्रीला काढले आहे. आज त्यांच्या सत्याग्रहाचा चौथा दिवस आहे. ते मधूमेह व र्‍हदय विकार आहे. त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. यावरही न्याय मिळाला नाही तर सहकार कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पत्रकार जोशी यांनी दिला आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने