Reservation: फडणवीस यांचा मराठा आरक्षणावाल्यांना इशारा...

ओबीसी आरक्षणात इतरांना वाटेकरी स्वीकारणार नाही; प्रसंगी रस्त्यावर उतरू

मुंबई, दि. १३:- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच पण, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं. (devendra fadnavis Oppose Additional Reservation In Obc Reservation For others)

आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. या कार्यकारिणीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा देतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचं कलम टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच याबाबत अध्यादेश काढण्याची मागणी केली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीने भूमिका जाहीर करण्याचे फडणवीस यांचे आव्हान

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी आरक्षणात कोणीही वाटेकरी नको. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानच त्यांनी यावेळी दिलं. ओबीसी आरक्षणावरून दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांमध्येच वेगवेगळ्या भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. (devendra fadnavis Oppose Additional Reservation In Obc Reservation For others)

ओबीसी नेते मंत्रिमंडळात गप्प.... 

यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्र्यांवरही टीका केली. ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करत ओबीसी मंत्री बाहेर आंदोलन करत आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात. काहीही करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

ओबीसींचा मेळावा घेणार Gathering of OBCs 

ओबीसींचा विकास होणार नाही, तोपर्यंत राज्याचा विकास होणार ननाही. त्यामुळे ओबीसींची विकास झाला पाहिजे. येत्या काळात 346 ओबीसी घटकांचा मेळावा घेतला जाईल. येणारा काळ संघर्षाचा असल्याने ओबीसी मोर्चाची मोठी जबाबदारी असणार आहे, असं ते म्हणाले. भाजपमध्ये ओबीसींचं योगदान मोठं आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींचा पक्ष म्हटलं जायचं असं सांगतानाच ‘सबका साथ सबका विकास’ हेच भाजपचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले. (devendra fadnavis says unity of OBCs will be strengthened in Maharashtra state. He also opposed inclusion of other castes in OBC and Additional Reservation In Obc Reservation).

माजी मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षणासाठी चांगला प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस यांनी आता ओबीसी आरक्षणावरून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गात इतरांना स्थान नको, अशी भूमिका घेतली आहे. मराठा समाजातील काही संघटना आणि नेते ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेले हे विधान म्हणजे मराठा संघटनांना इशारा समजला जात आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने