हिंगोली:- हिंगोली लोकसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींनी आगामी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवडून आणल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासकामे करण्यासाठी ५ लक्ष रुपयाचा खासदार निधी देण्यात येणार असल्याची घोषणा खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. (Unopposed elected gram Panchayat Will get Rs. 5 lakh funds, declares Shivsena Member of Parliament Hemant Patil)
ग्रामीण स्तरावरील मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या ग्राम पंचायत निवडणुकांचा बिगुल राज्यात वाजला असून धुरळा अन गुलाल उडविण्यासाठी सगळीकडे तारंबळ उडाली आहे. आमचं पॅनल ,आमचा वार्ड वार्डातील रात्रीच्या बैठकी , राखीव आणि आरक्षणानुसार सुटलेल्या जागा यावर गावागावात चांगलीच चर्चा रंगली आहे. कोरोना काळात शहरातून गावाकडे न येऊ देणाऱ्या गावकऱ्यांना आता गावातील पुढारी स्वतःच्या गाडीने गावाकडे घेऊन जात आहेत. यासर्व धामधुमीत गावातील हि निवडणूक खूपच प्रतिष्ठेची समजली जाते. (Unopposed elected gram Panchayat Will get Rs. 5 lakh funds, declares Shivsena Member of Parliament Hemant Patil)
यातही दरवेळी सामंजस्याने विचार करून गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक लढवून गावातील एकोपा कायम ठेवण्याचा प्रयन्त करत असतात हीच परंपरा कायम राहावी आणि विकासाची गंगा प्रत्येक गावागावात जावी या उद्देशाने हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांनी असे आवाहन केले आहे कि, हिंगोली मतदार संघात येणाऱ्या ११ तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची आगामी निवडणूक आहे त्यांनी आपल्या गावची निवडणूक बिनविरोध करावी आणि गावच्या विकासासाठी ५ लक्ष रुपयाचा खासदार निधी घेऊन जावा. दर पाच वर्षांनी निवडणुकीच्या दरम्यान होणारे भांडण तंटे, वाद या पासून गावाला मुक्त करण्याचा प्रामाणिक हेतू असून कोणतेही छुपे राजकारण यामध्ये नसल्याची भावना सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
आपल्या देशात दिल्लीच्या राजकारणापेक्षा गल्लीच्या राजकारणाला खूप महत्व दिले जाते त्यामुळे सर्व जुने वाद तंटे यावेळी उफाळून येऊन गल्लीच्या राजकारणाला निवडणुकीव्यतिरिक्त वेगळाच रंग चढतो त्यामुळे गाव सुखी तर देश सुखी यानुसार गावातील राजकारण जास्त न तापता एकोप्याने झाले पाहिजे असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. यामुळे आगामी काळात कोणती ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक लढवून गावाच्या विकासासाठी ५ लक्ष रुपयाचा खासदार निधी घेऊन जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.