Bharat Band Agitation: बंदमुळे जेवढे नुकसान झाले त्या पैशात दिल्लीत सर्व लोकांना दोनदा झाल असत कोरोना लसीकरण

एका विश्लेषणातून आल समोर सत्य...... 

नवी दिल्ली, दि. 9:- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या 14 दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. याच पार्श्वभूमिवर मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली. या बंदला पाठिंबा देण्यासाठी देशभरात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. हा आर्थिक फटका इतका मोठा होता की यामध्ये कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात दिल्लीत सगळ्यांना मोफत लस वाटता आली असती. (Delhi loss due to bharat bandh on 8 december)

खरंतर, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण कालच्या बंदमुळे कुठे आणि काय परिणाम झाला यावर काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी बंद पुकारला असला तरी बऱ्याच ठिकाणी आपत्कालीन सेवेसाठी मार्ग करून देण्यात आला. पण अनेक ठिकाणी भारत बंदमुळे रुग्णांचं मोठं नुकसान झालं आहे.

भारत बंदमुळे अनेक बाजार समित्या, व्यवहार, वाहतूक, ऑफिसेस बंद होती. यामुळे नुकसानीचा आकडाही मोठा आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण मंगळवारी झालेल्या बंदमुळे फक्त दिल्लीतच 700 ते 800 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. खरंतर, यामध्ये संपूर्ण देशातील लोकांना मोफत लसीकरण करता आलं असतं. तर एका अंदाजानुसार भारतात या बंदमुळे (विशेषत: उत्तर भारतात, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्यात) २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  Rs. 25000 crore loss due to the Bharat Band Agitation in India. 

प्रति व्यक्ती 475 रुपयांचे नुकसान Loss of Rs. 475/person

800 कोटींच्या नुकसानीनुसार, आज दिल्लीतील प्रत्येक नागरिकाचे सुमारे 475 रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणजेच, आज चोवीस तासात दिल्लीत नागरिकांच्या खिशातून 475 रुपये कापले गेले यांची त्यांना कल्पनाही नाही. तुमच्यातील बर्‍याच जणांसाठी ही रक्कम छोटी असेल. पण असं नाही. कारण, भारतात ज्या सीरमच्या लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत तिची किंमतही याच्या आसपास आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सीरमच्या (Syrum Institute Vaccine costs Rs. 250/dose) एका डोसची किंमत 250 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना एका दिवसात 475 रुपयांचं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच, चोवीस तासांच्या बंदमध्ये दिल्लीकरांचे जेवढं नुकसान झालं तेवढ्यात कोरोनाचं मोफत लसीकरण करता आलं असतं. (Delhi loss due to bharat bandh on 8 december)

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने