Bhima Koregaon: इतिहास प्रसिद्ध भिमा कोरेगाव युद्धावरील ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपट नविन वर्षात सिनेमागृहात

पोस्टर रिलीज: प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल, अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंह यांची प्रमूख भूमिका (The Battle Of Bhima Koregaon Poster Released)

मुंबई, दि. ११:- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालाची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित आणि इतिहास प्रसिद्ध कोरेगाव भिमा युद्धावर अधारीत असलेला ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. अर्जुन रामपालने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. हा ऐतिहासिक आणि बहुचर्चित चित्रपट येत्या 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपालसोबत अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंहही दिसणार आहेत. (The Battle Of Bhima Koregaon Poster Released).

कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहिद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth- (हा विजय म्हणजे ब्रिटीश सैन्याने पृथ्वीतलावर मिळविलेल्या विजयांपैकी एक....)’ हा विजय ब्रिटीश साम्राज्याला किती महत्वाचा होता हे दिसून येते. या युद्धानंतर भारतात ब्रिटीशांचे एकसंघ साम्राज्य निर्माण झाले. यावरून या युद्धाचे इतिहासातील महत्व समजून येईल.  

अर्जुन रामपालने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये त्याचा अनोखा लूक दिसत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अर्जुनची वाढलेली दाढी, लांब केस आणि हातातील शस्त्र दिसत आहे. त्यामुळे अर्जुन एखाद्या योद्ध्याप्रमाणे भासत आहे. या पोस्टरला कॅप्शन देताना अर्जुनने Proud to be part of a historical event that blew my mind and is sure to blow yours, असे कॅप्शन दिले आहे.
“ Proud to be part of a historical event that blew my mind and is sure to blow yours. #TheBattleofBhimaKoregaon coming in 2021. या एका ऐतिहासिक घटनेचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा मला अभिमान आहे. यामुळे माझं मन हेलावून गेलं आहे. त्यामुळे तुमचेही मन हेलावून जाईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे येत्या 2021 ला #TheBattleofBhimaKoregaon सज्ज व्हा,” असे कॅप्शन अर्जुनने या पोस्टरला दिले आहे.

पोस्टरमध्ये महार सैन्याचा कप्तान हातात तलवार घेवून उभा आहे. सोबतच इतर सैनिक दिसत आहेत आणि युद्धाचे हे दृश्य पडत्या पावसात आहे. कारण जानेवारी महिन्यात त्यावेळी पाऊस होता आणि पडत्या पावसात, अर्धपोटी, भुकेल्या ५०० महार सैनिकानी २५ हजार पेक्षा जास्त संख्या असलेल्या पेशवे/मराठा सैनिकाना हरवून हे युद्ध जिंकले होते. या युद्धात महार सैनिकांचे केवळ २० शहिद व ३ जखमी झाले होते. तर शेकडो पेशवे/मराठा सैनिक मृत्यूमुखी पडले होते. हजारो जखमी झाले होते. त्यामूळे या युद्धाकडे शौर्याचे एक प्रतिक म्हणून पाहिले जाते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी १ जानेवारीला दरवर्षी भेट देवून आपल्या पुर्वजानी गाजविलेल्या शौर्यातून  स्फुर्ती घेत असत.

पेशवाई/ मराठा साम्राज्याचा अस्त करणार्‍‍‍‍या या युद्धाचा असा आहे इतिहास.....

कोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झालेल्या मराठा साम्राज्याचा अस्त झाला. (The Historical Battle Of Bhima Koregaon Poster Released)

महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (पूर्वाश्रमीचे महार), दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमुर्ती व डॉ. आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहिद सैनिकांच्या विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते. (सौजन्य:- https://mr.wikipedia.org/wiki (विकीपीडीया).

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने