1 जानेवारीपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, लागू होणार नवा नियम

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बँकिंग क्षेत्रातील घोटाळे (Banking Fraud) मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशात ग्राहकांची होणार फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वर्षात चेक (Cheque) पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती आहे. खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. (cheque payments positive pay system to come into effect 1 january )
या सुविधेमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 50,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्यासाठी रक्कम चेकद्वारे सुनिश्चित करणं महत्त्वाचं असणार आहे. या सिस्टमच्या माध्यमातून चेकला एसएमएस (SMS), मोबाइल अॅप (Mobile App), इंटरनेट बँकिंग (Internet Banking) आणि एटीएम (ATM) द्वारे दिला जाऊ शकतं.

कशी काम करणार पॉझिटिव्ह पे सिस्टम ?

पॉझिटिव्ह पे सिस्टमअंतर्गत जो धनादेश देईल त्याला चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देयकाची रक्कम सांगावी लागणार आहे. व्यक्ती एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती देऊ शकतो.

यानंतर चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची उलट तपासणीदेखील केली जाईल. ज्यामध्ये काही त्रुटी असल्यास चेक सिस्टम तपासाण्यात येईल. जर यामध्ये काही गडबड झाली तर ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’ (CTS – Cheque Truncation System) त्याला अधोरेखित केलं जातं आणि तशी बँकेला महत्त्वाची माहिती पुरवली जाते.

50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास नियम लागू

50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास बँक खातेदारांसाठी नवीन नियम लागू करतील. इतकंच नाही तर या सुविधेचा लाभ घेण्याचा निर्णय हा खातेधारकांचा असेल. पण वारंवार समोर येणारे घोटाळे पाहता बँका 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक धनादेशांच्या बाबतीत हे अनिवार्य करू शकतात. (cheque payments positive pay system to come into effect 1 january: source tv9)

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने