Historical आर्या राजेंद्रन यांनी मोडला देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम; सर्वात कमी वयाच्या महापौर म्हणून सन्मान.....

तिरुवनंतपुरम|डीएम न्यूज:- केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली आहे. ती आता तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी महापौर झाले होते. देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे. (Kerala's Arya Rajendran will became youngest mayor and break record of Devendra Fadnavis)
आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर होणार आहे. ती सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहे. आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाली असून ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य देखील आहे. (Arya Rajendran will be the youngest mayor in India. She is currently studying BSc Maths at All Saints College. Arya Rajendran has won the election on the ticket of the Marxist Communist Party and is also a member of the state executive of the Student Federation of India.)

आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयन तर आई एलआयसी एजंट

आर्या राजेंद्रन सीपीएमच्या ब्रँच कमिटी सदस्य असून बालाजनसंघम प्रदेशाची अध्यक्ष आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयनचे काम करतात. तर, तिची आई श्रीलथा एलआयसी एजंट म्हणून काम करते. केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंटने विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एलडीएफ प्रथम क्रमांकावर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

केरळमधील स्थानिक निवडणुकांमध्ये 941 ग्रामपंचायत आणि 14 जिल्हा परिषदांमध्ये सत्तारुढ डाव्या आघाडीनं मोठा विजय मिळवला आहे. 10 जिल्हा परिष, 152 पंचायत समित्यांमध्ये सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएपला विजय मिळवला आहे. तर भाजपनं 23 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.
सर्वात तरुण महापौरपदाचा विक्रम देवेंद्र फडणवीसांच्या नावावर

देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस नागपूरच्या राम नगर वार्डमधून विजयी झाले होते. देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपराजधानीचे महापौर झाले होते. तर, आर्या राजेंद्रन केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरमची महापौर होणार आहे. तब्बल 23 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरील रेकॉर्ड मोडले जाणार आहे. (In the year 1997, Devendra Fadnavis, BJP leader and the Leader of Opposition in the Maharashtra Legislative Assembly, holds the record of being the youngest mayor in the country. Devendra Fadnavis had become the Mayor of Nagpur Municipal Corporation at the age of 27. Devendra Fadnavis had become the Mayor of Nagpur city. Now Arya Rajendran will be the mayor of Thiruvananthapuram, the capital of Kerala. After 23 years, the record in the name of Devendra Fadnavis will be broken.)

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने