हिंगोलीत आढळली वारकरी सांप्रदायातील बुद्ध मुर्ती

बुद्ध-चोखामेळा स्मारकाचा जिर्णोद्धार करण्यासाठी बैठकीचे आयोजन

हिंगोली, दि. २:- संत नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे नामदेव मंदिराजवळच ज्ञात माहितीनुसार, महाराष्ट्र किंवा देशात कुठेच आढळून न आलेल्या वारकरी सांप्रदयातील वारकरी महात्मा बुद्ध आणि संत चोखामेळा यांच्या पाषाण मुर्तीना जतन करण्यासाठी आणि तेथील ओट्याचा जिर्णोद्धार करण्यासाठी दिनाक ८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता नर्सी नामदेव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
नर्सी हे ग्राम पुरोगामी संत नामदेव यांच्या जन्मस्थळामूळे जगभर प्रसिद्ध आहे. संत नामदेव यानी त्यांच्या अभंगात अनेक वेळा महात्मा बुद्धांच्या संदेशांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे महात्मा बुद्ध हे संत नामदेव यांच्यासाठी गुरुस्थानी होते हे निर्विवाद सत्य आहे. तर संत नामदेवांच्या समतावादी विचाराचे पाईक आणि त्यांचे शिष्य संत चोखामेळा यांचेही संत साहित्य आणि त्या क्षेत्रात स्थान मोठे आहे. महात्मा बुद्ध- संत नामदेव- संत चोखामेळा या गुरू शिष्यांचे त्याकाळी नावाजलेले स्मारक नर्सी नामदेव येथे होते. परंतू नंतरच्या काळात संत नामदेव यांच्या मंदिराचा विकास झाला तसा महात्मा बुद्ध- संत चोखामेळा यांच्या स्मारकांचा विकास मात्र झाला नाही आणि आजघडीला ही या दोन्ही महापुरुषांच्या मुर्ती अडगळीत पडल्या आहेत. या स्मारकातील बुद्ध मुर्ती ही मिशा असलेली आणि गळ्यात माळ असलेली आहे. वारकरी सांप्रदायाला अभिप्रेत ही पाषाण मुर्ती घडविण्यात आली आहे. अशा प्रकारची ही एकमेव मुर्ती असल्याचे दिसून येते. त्यामूळे या मुर्तीला अणण्यसाधारण महत्व आहे. या ऐतिहासीक मुर्तींचा योग्य सन्मान व्हावा, त्यांचे योग्य जतन व्हावे या उद्देशाने दिनाक ८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता नर्सी येथे संत नामदेव मंदिराच्या सभागृहात जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हीच ती वारकरी सांप्रदायातील बुद्धमुर्ती....
या बैठकीच्या निमंत्रण पत्रिका किंवा व्यक्तिगत निमंत्रण कोणालाही देण्यात आलेले नाही. त्यामूळे जिल्ह्यातील महात्मा बुद्ध, संत चोखामेळा प्रेमी जनतेने निमंत्रणाची अपेक्षा न ठेवता यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवहन संयोजक बाजार समितीचे माजी संचालक बबन सावंत, जेष्ठ सामाजिक नेते श्रीकिशन नाईकवाडे, अ‍ॅड. रावण धाबे, रामभाऊ नितनवरे, प्रतिष्ठीत नागरीक शाहुराव देशमूख, पत्रकार बापुराव इंगोले, कपील धबडगे आदीनी केले आहे.


0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post