लव जिहाद ठरविलेल्या आयएएस अधिकाऱ्यांची अखेर फारकत.......

आयएएस अधिकारी असलेल्या हिंदू-मुस्लीम तरुणी-तरुणाने केलेल्या विवाहाला हिंदू महासभेने लव्ह जिहाद ठरविले होते. टीना दाबी अख्तर खान असे नाव असलेल्या या जोडप्याने दोन वर्षानंतर परस्परांच्या सहमतीन फारकतीसाठी जयपूर येथील कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
२०१५ मध्ये आयएएस टॉपर असलेल्या या जोडप्यांचे मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी फॉर ऍडमिनिस्ट्रेशन येथे सूत जमले होते त्यानंतर दोघांनीही प्रेम विवाह केला होता. तर खान मुस्लिम तर टीना हिंदू दलीत असल्याने या विवाहाला हिंदू महासभेने विरोध केला होता. तसेच या विवाहाला लव जिहाद संबोधून अख्तर खानसोबत विवाह न करण्याचे आवाहन केले होते. परंतु टीनाने हिंदू महासभेवर टीका करून हा आपला व्यक्तिगत प्रश्न असल्याचे स्पष्ट करीत प्राप्त खान यांच्यासोबत विवाह केला होता. परंतु गेल्या वर्षभरात दोघांमध्ये न पटल्याने त्यांनी शेवटी जयपूर येथील कौटुंबिक न्यायालयात फारकती साठी अर्ज दाखल केला आहे.

टीना दाबी ही अनुसूचीत जाती प्रवर्गातील तरुणी देशात मुलींमधून प्रथम आली होती. तर मुस्लिम समाजातील अख्तर खान सामान्य प्रवर्गातून देशात प्रथम आला होता. देशात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळाल्यावर टीना दाबी हिने मुंबईत येवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर श्रद्धांजली अर्पण केली होती.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने