Suicide: बाबा आमटे यांची नात तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

घरातील कलह कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज....

चंद्रपूर, दि. ३०:- ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेत आत्महत्या केली आहे. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे. (DR. Sheetal Aamte Commit suicide)

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वी शीतल यांची प्राणज्योत मालवली. शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.

या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आलं आहे. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.

शीतल आमटे या शिक्षणाने डॉक्टर होत्या. त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे त्यांचे आई-वडील आहेत. त्यांचे आजोबा बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. (DR. Sheetal Aamte Commit suicide). त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या