नांदेड, दि. ११ नोव्हेंबर:- वय वर्ष अवघे २४, घरी परिस्थिती अत्यंत बेताची त्यातच ब्लडकॅन्सर सारख्या भयंकर आजाराने ग्रासलेल्या परमेश्वर कदम यांना उपचारासाठी लागणारी रक्कम मात्र परिवाराकडून कधीच पूर्ण होणार नाही.यादरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्या संपर्कात आल्यांनतर प्रधानमंत्री राहत कोषातून मदतीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून उपचारासाठी लागणारी ६ लक्ष रुपयाची मदत दोन टप्यात मिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज परमेश्वर कदम आजाराशी दोन हात करून जीवन जगत आहेत. खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे जीवदान मिळाल्याची भावना कदम यांनी व्यक्त केली .
देशातील सर्व सामान्य जनतेला गंभीर आजाराच्या उपचारासाठी प्रधानमंत्री राहत कोष संकल्पना अस्तित्वात आली आणि आजवर लाखो रुग्णांना आर्थिक मदत मिळाल्याने जीवदान मिळाले आहे .गंभीर आजारातून रुग्ण बरे होऊन सर्व सामान्य जीवन जगत आहेत . याच मदतीचा लाभ मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गणिपूर येथील परमेश्वर महादेवराव कदम आज सर्व सामान्य जीवन जगत आहेत. परमेशवर यांचे वय वर्ष अवघे २४ वर्ष दोन वर्षांपूर्वी त्यांना ब्लड कॅन्सर हा भयंकर आजार झाल्याचे निष्पन्न झाले . त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची ज्यावेळी त्यांना आजार झाल्याचे समजले ,तेव्हा ते नांदेड च्या एका महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत होते . आजारामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले . डॉक्टरांनी आजाराच्या उपचारासाठी तब्बल १५ लक्ष रुपयाचा खर्च सांगितला . तुटपुंज्या शेतीच्या उत्पनावर हा खर्च होणार नाही ,आणि वेळीच उपचार नाही मिळाले तर या चिंतेने ग्रासल्यानंतर , पैस्याची जमवा-जमव करण्यासाठी सुरवात केल्यानांतर खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क केल्यावर प्रधानमंत्री राहत कोषाबद्दल माहिती देण्यात आली. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या आरोग्यदूतांनी पूर्ण मदत केली आणि परमेशवर यांच्यावर औरंगाबादच्या कमलनयन बजाज हॉस्पिटल मध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या सहकार्यामुळेच उपचार सुरु करण्यात आले.
यादरम्यान आर्थिक मदतीची प्रकिया पूर्ण होऊन मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ३ लक्ष रुपयाची मदत खात्यावर जमा करण्यात आली . त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यांनतर आत दर तीन महिन्याला उपचार करण्यात येत आहेत आणि पुढील उपचारासाठी सुद्धा ३ लक्ष रुपये ऑक्टोबर 2020 मध्ये जमा करण्यात आले. असे एकूण ६ लक्ष रुपये मदत आजवर मिळाल्यामुळे परमेशवर यांना जीवदान मिळाले यामुळे ते सर्व सामान्याप्रमाणे जीवन जगत असून अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करत आहेत. खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे उपचारासाठी वेळीच आर्थिक मदत मिळाल्यामुळे तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याची भावना परमेश्वर कदम आणि त्यांच्या परिवाराने व्यक्त केली.