मुंबई, दि. १४ नोव्हेंबर:- जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी येथील दलित तरूणीवर सामुहिक बलात्कार करून, तिला विष पाजून हत्या करण्यात आली. या घटनेतील नराधमांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी रिपाइं (आठवले) महिला आघाडी राष्ट्रीय नेत्या सौ.सीमाताई रामदासजी आठवले यांनी केली आहे.
टोळी गावातील रहिवासी असलेले आरोपी शिवानंद शालिक पवार, पप्पू अशोक पाटील आणि अशोक वालजी पाटील या तिघांनी पीडितेचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार करून तीची हत्या करण्यात आली आहे. यातील शिवानंद पवार हा पीडितेवर मैत्री करण्यासाठी दबाव टाकत असे. पीडितेने धुळे येथे उपचारासाठी नेत असताना नातेवाईकांना घटनेबाबत माहिती दिली. ७ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपींनी पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिचे पारोळा शहरातून अपहरण केले. त्यानंतर तिला एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. पीडितेने प्रतिकार केला असता, तिघा नराधमांसह एका अनोळखी महिलेने पीडितेला शिवीगाळ करत बळजबरीने विष पाजून तिच्या मृत्यूस करणीभूत ठरले आहेत. या घटनेतील सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी. सीमाताई रामदासजी आठवले यांनी केली आहे.